शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

शिंदेंच्या शिवसेनेच्या शहरप्रमुखाने कापला 'भावी आमदार' लिहिलेला केक, चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2024 22:59 IST

Maharashtra Politics in Kalyan Dombivli: शिंदेंच्या शिवसेनेचे डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांचा रविवारी वाढदिवस होता

मयुरी चव्हाण काकडे, लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याणडोंबिवली: राज्यभरात आता विधानसभेच्या निवडणुकीचे वेध लागले असून सर्व राजकीय पक्षांमध्ये आतापासूनच जागा वाटपावरून खलबतं सुरू झाली आहेत. कल्याणडोंबिवली विभागाचे राजकारण नेहमीच रंगतदार राहिले आहे. कल्याण डोंबिवली शहरात आमदारकीच्या निवडणुका लढवण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवारांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तशातच रविवारी शिवसेना शिंदे गटाच्या शहर प्रमुखाने भावी आमदाराचा केक कापल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

केकवर 'भावी आमदार'

शिंदेंच्या शिवसेनेचे डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांचा रविवारी वाढदिवस होता. यावेळी शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. यावेळी सर्व क्षेत्रातील लोक उपस्थित होते. मोरे यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी आणलेल्या केकवर 'भावी आमदार' असा उल्लेख होता. हा केक मोरे यांनी कापल्यावर शाखेमध्ये मोठा जल्लोष झाला.

कल्याण ग्रामीणमधून निवडणूक लढवण्यात इच्छुक

राजेश मोरे हे कल्याण ग्रामीणमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून त्यांचं नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. निवडणूक लढवण्यासाठी आपण इच्छुक असल्याचे याआधीही मोरे यांनी 'लोकमत'शी बोलताना मान्य केलं होतं. त्यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ डोंबिवलीतच नाही तर कल्याण शहरात, कल्याण ग्रामीण परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली. त्यातच कार्यकर्त्यांनी मोरे यांच्यासाठी भावी आमदार असं नमूद केलेला केक सेलिब्रेशनसाठी आणल्याने आता येणाऱ्या काळात मोरे यांची ही इच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनावर घेतात का, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेkalyanकल्याणdombivaliडोंबिवलीMLAआमदार