कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिका महापौरपदासाठी शिंदेसेनेच्या हर्षाली थवील चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर उपमहापौरपदासाठीभाजपाकडून राहुल दामले यांनी अर्ज दाखल केला आहे. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, मनसे नेते राजू पाटील, आमदार राजेश मोरे, भाजपाचे दीपेश म्हात्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कल्याण डोंबिवली महापालिकेत निकालानंतर बऱ्याच उलथापालथी घडल्या. याठिकाणी भाजपा शिंदेसेनेने महायुती म्हणून निवडणूक लढवली. त्यात शिंदेसेनेने ५३ तर भाजपाने ५० जागा जिंकल्या. मात्र त्यानंतर मनसेने अनपेक्षितपणे शिंदेसेनेला पाठिंबा जाहीर केल्यानंतर महायुतीबाबत प्रश्न उपस्थित झाले. भाजपाला दूर करून शिंदेसेना कल्याण डोंबिवलीत महापौरपदासाठी हालचाली करत असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र आज अखेर महायुती म्हणूनच या पक्षांनी महापौर, उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केले आहेत.
यावेळी खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महापौरपदासाठी शिवसेनेकडून हर्षाली चौधरी आणि उपमहापौरपदासाठी भाजपाचे राहुल दामले यांचा अर्ज दाखल केला आहे. मी विशेष करून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे नेते राजू पाटील यांचे आभार मानतो. त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला. त्यामुळे मोठी ताकद शिवसेना-भाजपाची होती पण त्यात मनसेची भर पडली आहे. मनसेची साथ महायुतीला आहे. येणाऱ्या ३ तारखेला महापौर-उपमहापौर बिनविरोध निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिंदेसेना-भाजपात होती चढाओढ
दरम्यान, कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपाला ५० आणि शिंदेसेनेला ५३ जागा मिळाल्यानंतर महापौरपदाची लढाई सुरू झाली होती. दोन्ही पक्षांकडून महापौरपदासाठी जोरदार राजकीय हालचाली होत असल्याचं दिसून आले होते. या दोन्ही पक्षांकडे मिळून पुरेसे संख्याबळ होते तरी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. यात उद्धवसेनेचे दोन नगरसेवक शिंदेसेनेच्या संपर्कात आहेत. तर भाजपाच्या माजी आमदारांनी उद्धवसेना आणि मनसेचे नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा केल्याने दोन्ही पक्षांमध्ये महापौरपदासाठी राजकीय लढाई तीव्र झाल्याच्या बातम्या पुढे आल्या होत्या. मात्र आज या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला असून महायुती म्हणून शिंदेसेना-भाजपा सत्ता स्थापन करत असल्याचे स्पष्ट झाले.
Web Summary : Harshali Chaudhari of Shinde's Sena filed mayor nomination in Kalyan-Dombivli. BJP's Rahul Damle seeks deputy mayor post. Shinde thanked MNS for support, ensuring a strong coalition victory. Elections are on the 3rd.
Web Summary : कल्याण-डोंबिवली में शिंदे सेना की हर्षाली चौधरी ने महापौर पद के लिए नामांकन दाखिल किया। भाजपा के राहुल दमाले ने उपमहापौर पद के लिए अर्जी दी। शिंदे ने समर्थन के लिए मनसे को धन्यवाद दिया, जिससे गठबंधन की मजबूत जीत सुनिश्चित हुई। चुनाव 3 तारीख को हैं।