शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण ग्रोथ सेंटर रद्द करण्याची मागणी; मेट्रो कारशेडप्रमाणे हाही प्रकल्प होणार रद्द? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 01:07 IST

संघर्ष समिती घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

कल्याण : केडीएमसीतील २७ गावांपैकी १८ गावे महापालिकेतून वगळण्याची प्रक्रिया सरकारदरबारी सुरू आहे. मात्र, २०१५ मध्ये २७ गावांपैकी १० गावांच्या हद्दीतील एक हजार ८९ हेक्टर जमिनीवर कल्याण ग्रोथ सेंटरची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. हे ग्रोथ सेंटर शेतकऱ्यांच्या हिताचे नसल्याने रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी २७ गावे सर्वपक्षीय संघर्ष समिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. या भेटीतून तोडगा निघाला नाही, तर उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती समितीने दिली.

मेट्रो कारशेड आरेच्या जमिनीवर उभे करण्याचा मागील सरकारचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने बदलला आहे. आता ग्रोथ सेंटरचा निर्णयही बदलणार का, असा सवाल केला जात आहे. समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे व सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली आहे. पाटील म्हणाले की, ‘कल्याण ग्रोथ सेंटरची घोषणा २०१५ मध्ये करण्यात आली. एक हजार ८९ हेक्टर जागेवरील ग्रोथ सेंटरकरिता एक हजार ८९ कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला. दहा गावांत हे ग्रोथ सेंटर विकसित केले जाणार आहे. प्रत्यक्षात २०१५ साली २७ गावे महापालिकेत समाविष्ट झाली. आजची स्थिती वेगळी आहे. २७ गावांपैकी १८ गावांची स्वतंत्र कल्याण उपनगर परिषद स्थापन करण्याची प्रक्रिया राज्य सरकारद्वारे सुरू आहे. ग्रोथ सेंटरच्या १० गावांपैकी काही गावे महापलिकेत तर काही गावे नव्या उपनगर परिषदेत समाविष्ट केली आहेत. या १० गावांत नव्या बांधकामांना एमएमआरडीएकडून बांधकाम परवानगी दिली जात नाही.

एका परवानगीकरिता तीन वर्षांचा कालावधी लागत आहे. हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच परवानग्या देण्यात आल्या आहेत. या गावात एक गुंठा जमिनीचा भाव २५ लाख रुपये इतका आहे. शेतकऱ्यांची ५० टक्के जागा घेणार. ती विकसित करून देणार. त्यात रस्ता तयार करणार, लाइटची व्यवस्था करणार. सरकारकडून ग्राेथ सेंटरच्या विकासापाेटी ०.९५ एफएसआय दिला जात आहे. जागा ५० टक्के घेऊन एफएसआय इतका कमी कसा काय दिला आहे.’ 

‘बिल्डरांना कोणतीही आडकाठी नाही’

  • १० गावांत शेकडो एकर जमिनी बड्या बिल्डरांनी घेतल्या आहेत. त्यांच्याकडून विकास सुरू आहे. त्यांना कोणतीही आडकाठी सरकारने केली नाही. केवळ शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. बड्या बिल्डरांचे प्रकल्प सुरू आहेत. 
  • आता सरकारला ग्रोथ सेंटरसाठी घेण्यास जागा शिल्लक राहिलेली नाही. आता जर ग्रोथ सेंटर उभे करायचे तर शेतजमीन व शेतकऱ्यांची राहती घरे द्यावी लागतील. 
  • महापालिका, एमएमआरडीए आणि नव्याने होऊ घातलेली नगर परिषद या तिहेरी पेचात येथील शेतकरी फसला आहे. त्यातून त्याची मुक्तता करण्याकरिता ग्रोथ सेंंटर रद्द करा, अशी मागणी समितीने केली आहे. 
टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे