महागडा मोबाईल चोरणारा गजाआड; रामनगर पोलिसांची कारवाई

By प्रशांत माने | Published: April 10, 2023 03:32 PM2023-04-10T15:32:23+5:302023-04-10T15:34:44+5:30

बीअर शॉपच्या काउंटरवरुन महागडा मोबाईल चोरणा-या चोरट्याला रामनगर पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत.

arrest who steals expensive mobile phones action of ramnagar police | महागडा मोबाईल चोरणारा गजाआड; रामनगर पोलिसांची कारवाई

महागडा मोबाईल चोरणारा गजाआड; रामनगर पोलिसांची कारवाई

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवलीः बीअर शॉपच्या काउंटरवरुन महागडा मोबाईल चोरणा-या चोरट्याला रामनगर पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. त्याच्याकडून चोरलेला ७० हजार रुपयांचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. विवेककुमार श्याम बिहारी श्रीवास्तव (वय२२) असे चोरटयाचे नाव आहे.

पद्माकर चौधरी यांचे ठाकुर्लीत बीअर शॉप आहे. शुक्रवारी ते रात्री ११ च्या सुमारास शॉप मध्ये असताना एक तरुण बीअर खरेदी करण्याच्या बहाण्याने आला. त्याला बीअर देण्यात पद्माकर व्यस्त असताना संबंधित तरुणाने तिथल्या काउंटरवर असलेला पद्माकर यांचा मोबाईल त्यांच्या नकळत चोरला आणि तेथून त्याने बीअर घेत काढता पाय घेतला. थोडयावेळाने मोबाईल गायब झाल्याचे पद्माकर यांच्या लक्षात आले. त्यांनी याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी बीअर शॉप मधील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले असता त्यात चोरटा आणि त्याचे मोबाईल चोरतानाचे दृश्य कैद झाले होते.

सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे रामनगर पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश सानप, पोलिस हवालदार विशाल वाघ, प्रशांत सरनाईक, नितीन सांगळे आणि दिलीप कोती यांनी चोरटयाचा ठावठिकाणा शोधून काढीत त्याला ठाकुर्लीत पाठलाग करुन अटक केली. डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील कुराडे, रामनगर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सचिन सांडभोर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) समशेर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सानप यांच्या पथकाने तपास करीत आरोपी विवेककुमार श्रीवास्तवला अटक करीत त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला. विवेककुमार हा फिरस्ता असून तो उत्तरप्रदेश राज्यातील रहिवासी आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: arrest who steals expensive mobile phones action of ramnagar police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.