शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
6
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
7
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
8
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
9
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
10
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
11
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
12
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
13
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
14
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
15
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
16
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
17
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
18
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
19
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
20
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

दैव बलवत्तर म्हणून बाळासह आईचे प्राण वाचले, पोलिसामुळे मिळालं जीवदान; कल्याण स्थानकात थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 07:40 IST

कल्याण रेल्वे स्थानकामध्ये मंगळवारी एक महिला आणि तिच्या एका वर्षाच्या मुलाला आरपीएफचे साहाय्यक उपनिरीक्षक हेमंत भरगुडे यांनी वाचविले तो थरारक क्षण.

डोंबिवली - कल्याण रेल्वे स्थानकामध्ये मंगळवारी आरपीएफ जवानाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला. धावत्या ट्रेनमधून उतरताना पाय घसरलेल्या महिला आणि तिच्या एक वर्षाच्या बाळाला आरपीएफचे साहाय्यक उपनिरीक्षक हेमंत भरगुडे यांनी तत्काळ धाव घेत वाचवले. दैव बलवत्तर म्हणून बाळासह आईचे प्राण वाचले. ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. 

अंतिमा शुक्ला असे त्या महिलेचे नाव असून, ती तिचा एक वर्षाचा मुलगा सर्वज्ञ याच्यासह प्रयागराज ते मुंबई असा प्रवास करत होती. ट्रेन कल्याण स्थानकात येत असताना उतरण्याच्या प्रयत्नात तिचा तोल गेला आणि ती बाळासह प्लॅटफॉर्म व रेल्वेगाडीच्या मधील जागेत घसरली. मात्र, तेथे ड्युटीवर असलेल्या भरगुडे यांनी प्रसंगावधान राखत क्षणाचाही विलंब न लावता तातडीने धाव घेत दोघांनाही सुरक्षित बाहेर काढले.

English
हिंदी सारांश
Web Title : RPF saves mother and child from train accident at Kalyan.

Web Summary : A vigilant RPF officer at Kalyan station saved a woman and her one-year-old child from a potential accident. The woman lost balance while exiting a train, but the officer swiftly rescued them, preventing serious injury.
टॅग्स :railwayरेल्वे