शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

बाबो! खेळण्यातील विमानाच्या प्रेमात पडली महिला, म्हणते आता हाच माझा बॉयफ्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 15:10 IST

एका हंगेरियन महिलेला (Woman Loves toy Plane) माणसावर नव्हे तर खेळण्यावर प्रेम झालं आहे. विशेष म्हणजे हे प्रेम खेळण्यांवर सहसा माणसाचं असतं तसं नाही, तर एखादा व्यक्ती समोरच्याच्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो तसं आहे.

जगात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात, ज्यांच्या आवडी-निवडीही वेगळ्या असतात. काहींना भौतिक गोष्टी आवडतात तर काहींना मानवी भावना आवडतात. काहींना एखाद्या व्यक्तीचं बाह्य रूप आवडतं, तर काहींना एखाद्याचं खरं मन आवडतं. मात्र एका हंगेरियन महिलेला (Woman Loves toy Plane) माणसावर नव्हे तर खेळण्यावर प्रेम झालं आहे. विशेष म्हणजे हे प्रेम खेळण्यांवर सहसा माणसाचं असतं तसं नाही, तर एखादा व्यक्ती समोरच्याच्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो तसं आहे.

बुडापेस्ट येथे राहणारी २८ वर्षीय सँड्रा एका खेळण्यातील प्लेनच्या प्रेमात पडली आहे (Relationship with Plane). या विमानाला ती प्रेमाने Luffancs म्हणते. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, महिलेने यावर्षी जानेवारीमध्ये 60 हजार रुपयांचं एक खेळणं विकत घेतलं होतं आणि ती त्याच्या प्रेमात पडली. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे तिला लहानपणापासूनच खेळण्यातील विमानांचं वेड होतं. ती ३ वर्षांची असतानाही अनेक विमानं खरेदी करायची.

मिळालेल्या माहितीनुसार, सँड्रा विमानाला तिच्या बेडवर घेऊन झोपते आणि सकाळ संध्याकाळ त्याला किस करत राहाते. विमानावरील प्रेमामुळे सँड्राने २०२१ मध्ये विमान वाहतूक उद्योगात नोकरी शोधली होती. आता ती तिच्या आवडत्या विमानांसोबत आणखी जास्त वेळ घालवते. सँड्राच्या आधीच्या बॉयफ्रेंडने तिच्या विमानावरील प्रेमावर कधीच आक्षेप घेतला नाही. परंतु गेल्या वर्षी तिचं ब्रेकअप झाल्यानंतर तिने माणसाशी नाही तर खेळण्यातील विमानाशी रिलेशनशिपमध्ये राहाण्याचा निर्णय घेतला.

जॅम प्रेसशी बोलताना ती म्हणाली की तिचं लूफँक्सवर इतकं प्रेम का आहे हे तिला माहिती नाही पण ती त्याच्यावर खूप प्रेम करते. ती म्हणाला की हे विमान अतिशय सुंदर आहे आणि तिचा सोलमेट आहे. तिने सांगितलं की, सकाळी उठल्यावर ती सर्वात आधी तिच्या विमानाकडे पाहते आणि झोपायला गेल्यावरही शेवटी त्यालाच पाहून झोपते. सँड्रानं असंही प्रांजळपणे सांगितलं की ती या विमानासोबत रोमान्सदेखील करते (Romance with Toy Plane) आणि त्याच्यासोबत खूप जिव्हाळ्याचे क्षण देखील शेअर करते.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके