शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
2
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
3
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
4
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, आतापर्यंत चौघांचा मृत्यू
5
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
6
यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
7
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
8
‘‘जॉनी जॉनी येस पापा’, सारख्या कविता मुलांना खोटं बोलायला शिकवतात’, उत्तर  प्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांचा दावा  
9
Viral Video: सांगितली स्कूटर अन् दरात उभी केली बीएमडब्लू, लेकानं दिलेलं गिफ्ट पाहून आई- बाबा झाले शॉक!
10
Trisha Krishnan : महागड्या कार, आलिशान घरासह कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे अभिनेत्री तृषा कृष्णन
11
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
12
सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार 'पावसात वाहून गेला'; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य
13
Spiritual Rebirth: एकटे राहावेसे वाटणे, भावनांचा उद्रेक होणे ही असू शकतात आध्यात्मिक पुनर्जन्माची लक्षणं!
14
"नुसतं नावाला 'घरचं मैदान', पिच बनवताना आम्हाला विचारत नाहीत.."; DC च्या कोचचा राग अनावर
15
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
16
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
17
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
18
Video - "डीएम अंकल, प्लीज रस्ता बनवून द्या..."; चिमुकलीची साद, अधिकारी आले थेट घरी
19
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
20
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
Daily Top 2Weekly Top 5

हवीहवीशी वाटणारी सुट्टी आता बोअर का होतेय? तुझं स्वतःचं आयुष्य डिझाइन करण्याचा हा काळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 09:46 IST

उन्हाळ्याची सुट्टी आत्ता सुरू झाली. पण मला कंटाळा यायला सुरुवात पण झाली.. मला सुट्टीत बोअर होऊ नये म्हणून मी काय करू? - कबीर, पुणे

रुचिरा दर्डा
संस्थापक, पॅरेंट विथ पर्पज 

ही एक गंमतच आहे. आपण खूप बिझी असतो तेव्हा वाटतं आपल्याला ब्रेक हवा आणि तो ब्रेक मिळतो तेव्हा आता या ब्रेकचं काय करावं हेच आपल्याला कळत नाही. त्यामुळे तुला जे वाटतंय ते कॉमन आहे; पण गमतीशीरही आहे.. चला, तुझी आणि तुझ्या मित्र-मैत्रिणींची उन्हाळ्याची सुट्टी इंटरेस्टिंग कशी करता येईल ते शोधूया. 

कंटाळा येतो म्हणजे काहीतरी वाईट आहे हे आधी डोक्यातून काढून टाक. कंटाळा आला की त्यातूनच आपल्याला नवीन काहीतरी सुचतं.. त्यामुळे कंटाळा आला तरी वाईट वाटून घेऊ नकोस अजिबात. पण, कंटाळा आल्यावर काय करायचं हे मात्र कुणीच सांगत नाही,  हो ना? मी सांगते. उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे तुझं स्वतःचं आयुष्य डिझाइन करण्याचा काळ आहे असं समज. काहीतरी गंमत होईल आणि कंटाळा जाईल अशी वाट बघत बसण्यापेक्षा आपण स्वतःच काहीतरी केलं तर? 

रोजचं रूटीन ठरव आणि ते फॉलो कर. म्हणजे खूप काटेकोर टाइमटेबल वगैरे नको. पण रोजच्या दिवशी काहीतरी छान करता येईल. सकाळी थोडा व्यायाम, सायकल चालवणं, खेळायला, चालायला जाणं. दुपारी घरीच थांबून चित्र काढणे किंवा काहीतरी आर्ट-क्राफ्ट कर. संध्याकाळी आईबाबांसोबत बाहेर जा किंवा मित्रांबरोबर ग्राउंडवर खेळ. एखादं नवीन कौशल्य शिकता येईल. त्यासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन क्लासही शोधता येईल. शाळा असते तेव्हा अभ्यासामुळे नवीन काही करून बघता येत नाही, मग ते आत्ता कर. एखादा नवीन खेळ, गाणं किंवा डान्स क्लास, चित्रकलेचा किंवा तुला आवडणाऱ्या कुठल्याही गोष्टीचा क्लास करता येईल. घरातली छोटीमोठी कामं, स्वयंपाकही तू शिकू शकतोस. आई-बाबांना, आजी-आजोबांना मदत केलीस तर ते खुश होतील आणि तुलाही नवीन काहीतरी शिकायला मिळेल. स्क्रॅपबुक करणं, मित्र-मैत्रिणींसाठी कार्ड्स तयार करणं अशा गोष्टीही तुला आवडत असतील तर तू करू शकतोस, बघ विचार करून.

काहीच करायचं नाहीये असाही एखादा दिवस असू शकतो. एखाद्या दिवशी तुला काहीच करायचं नसेल, झोपायचं असेल किंवा नुसतंच लोळायचं असेल तरी चालेल. सुट्टीत असा निवांत दिवसही हवा ना कधीतरी..! आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, सुट्टी आपोआप इंटरेस्टिंग होणार नाही, ते तुझं तुलाच करायला हवं. त्यामुळे ‘मला कंटाळा आला’ असं न म्हणता ‘आज मला काय करायचंय?’ असं स्वतःलाच विचार, तुला उत्तर नक्की सापडेल, आणि तुझी सुट्टी मस्त जाईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Boredom during vacation? Design your life, learn new skills!

Web Summary : Summer break offers a chance to design your life. Embrace boredom as a catalyst for creativity. Establish a routine with exercise, hobbies, and family time. Learn new skills, help at home, and remember relaxation is also key to an enjoyable vacation.