शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे”: सरसंघचालक मोहन भागवत
2
“मोदी सरकार काय लपवायचा प्रयत्न करत आहे?”; SIR वरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा सवाल
3
नगरपरिषद निवडणुकांसाठी एकनाथ शिंदेंचा धडका, १० दिवसांत ५३ सभा; जनता कौल देईल का?
4
पुतिन यांच्या भारत दौऱ्यात सर्वात मोठ्या डीलची तयारी...! संपूर्ण जग बघत राहणार, पाकिस्तान-चीनचं टेन्शन वाढणार
5
“CM असताना अडीच तासांपेक्षा जास्त कधी झोपलो नाही, विरोधकांची झोप उडवली”: एकनाथ शिंदे
6
महापरिनिर्वाण दिन २०२५: मध्य रेल्वे अतिरिक्त विशेष लोकल सेवा चालवणार; पाहा, वेळापत्रक
7
"...तर ताबडतोब देश सोडा!", डोनाल्ड ट्रम्प यांची मादुरो यांना फोनवर थेट धमकी; अमेरिका-व्हेनेझुएला युद्ध पेटणार?
8
अंत्यविधीसाठी कुटुंब परगावी, चोरट्यांनी साधली संधी; वॉशिंग मशीनमधील दागिने-पैसे केले लंपास
9
"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?
10
याला म्हणतात 'इंटरनॅशनल बेइज्जती'! रशियन तरुणींना कोणत्या देशाचे तरुण सर्वाधिक आवडतात? पाकिस्तानी ब्लॉगरचा VIDEO पाहून हसू आवरणार नाही!
11
VIDEO : रोहित-गंभीर यांच्यात वाद? ड्रेसिंग रुममधील व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा
12
SIR वरुन पश्चिम बंगालमध्ये तणाव वाढला; कोलकात्यात शेकडो BLO चे तीव्र आंदोलन...
13
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
14
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
15
तीन स्मार्ट मैत्रिणी अन् महिन्याला लाखोंची कमाई ! ब्रम्होसची माहिती देत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांतला केवळ तीन वर्षांची शिक्षा
16
लैंगिक शोषणाच्या तक्रारींची भिती दाखवणाऱ्या प्राध्यापकाला इतकी सौम्य शिक्षा कशी? चार प्राध्यापकांची केली होती फसवणूक
17
IND vs SA: रोहित शर्मासोबत एअरपोर्टवर नेमकं काय घडलं? विराट कोहलीही टक लावून बघतच बसला...
18
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
19
“आयोगाने पारदर्शी, प्रामाणिकपणे...”; निवडणुका स्थगित होताच असीम सरोदेंनी केली मोठी मागणी
20
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
Daily Top 2Weekly Top 5

बिअर बॉटलच्या झाकणाला 21 खाचेच का असतात? नेहमीच उघडत असाल पण उत्तर माहीत नसेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 15:50 IST

Interesting Facts : जर तुम्ही बिअरची बाटली उघडण्यापूर्वी झाकणाकडे पाहिलंत, तर तुम्हाला नेमके 21 खाचे दिसतील. हे केवळ योगायोग नाही, तर यामागे इतिहास आणि अभियांत्रिकीचे एक महत्त्वपूर्ण कारण आहे.

Interesting Facts : आपल्यातील बऱ्याच जणांना बिअर पिण्याची सवय असते. ओपनरने किंवा बाटलीच्या झाकणाखालील कोपरा उचलून आपण बिअर उघडतो. पण तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का की कोणत्याही बिअरच्या बाटलीच्या झाकणावर कायम 21 खाचे असतात? सामान्यपणे जास्तीत जास्त लोकांचं लक्ष आतल्या पेयाकडे असतं, झाकणावरील या बारीक गोष्टींकडे नाही. पण जर तुम्ही बिअरची बाटली उघडण्यापूर्वी झाकणाकडे पाहिलंत, तर तुम्हाला नेमके 21 खाचे दिसतील. हे केवळ योगायोग नाही, तर यामागे इतिहास आणि अभियांत्रिकीचे एक महत्त्वपूर्ण कारण आहे.

झाकणाला 21 खाचे असण्यामागचा 130 वर्षांचा इतिहास

हे डिझाइन तब्बल 130 वर्षे जुनं आहे. 1892 मध्ये “क्राउन कॅप” या झाकणाचा शोध लागला होता. हा मनोरंजक इतिहास एका डिजिटल क्रिएटरने शेअर केला आहे. हा झाकणाचा शोध विलियम पेंटर यांनी लावला. ते बाल्टिमोरमधील क्राउन कॉर्क & सील कंपनीचे संस्थापक होते.

21 खाच्यामागची कहाणी

विलियम पेंटर यांनी बिअरचा ताजेपणा, सुगंध आणि कार्बोनेशन टिकवून ठेवण्यासाठी झाकणावर किती चिरा किंवा खाचे असावेत, यावर प्रयोग केले.

कमी खाचे असतील तर

झाकण नीट सील होत नसे आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर पडत असे, म्हणजे बिअरची चव बिघडत होती.

खूप जास्त खाचे असतील तर

झाकण खराब होत असेल असे आणि सहज तुटत असे. बराच प्रयत्न केल्यानंतर त्यांनी जाणलं की 21 चिरा हेच सर्वात योग्य संतुलन देतात.

21 खाच्यांचे फायदे

झाकण मजबूत राहतं

कार्बोनेशन सुरक्षित राहतं

ओपनरने झाकण सहज उघडता येतं

बाटलीवर मजबूत आणि स्थिर पकड बसते

सुरुवातीला 24 खाचे असलेलं झाकणही बनवलं गेलं, पण स्वयंचलित बॉटल भरण्याच्या मशीनमध्ये ते अडकत होतं. त्यामुळे उत्पादनात अडथळे येत. यामुळे 21 खाच्यांचे डिझाइन जगभरात एक मानक बनले.

130 वर्षांची इंजिनिअरिंगची परंपरा

विलियम पेंटर यांच्या शोधाला आज 130 वर्षे झाली असली, तरी आजही जगातील प्रत्येक बिअर कंपनी त्याच 21 खाच्यांच्या डिझाइनचा वापर करते. म्हणून पुढच्या वेळी तुम्ही बिअरची बाटली उघडाल, तेव्हा लक्षात ठेवा.  हे फक्त एक साधं धातूचं झाकण नाही, तर विलियम पेंटर यांची बुद्धिमत्ता आणि 130 वर्षांचा अभियांत्रिकी वारसा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Why beer bottle caps have 21 ridges: The untold story.

Web Summary : Beer caps have 21 ridges due to a 1892 invention by William Painter. Experimentation revealed 21 ridges best preserve carbonation and cap strength. This design, now 130 years old, remains a global standard.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके