देशभरात पोलिसांचा गणवेश खाकी, पण मग कोलकाता पोलीस पांढऱ्या रंगाचा का घालतात? कारण असं जे माहीत नसेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 14:32 IST2026-04-29T14:32:01+5:302026-04-29T14:32:42+5:30

Kolkata Police Uniform : आपल्याला माहीत नसेल की, कोलकाता हे एकुलतं एक असं शहर आहे जिथे पोलिसांचे कपडे पांढऱ्या रंगाचे असतात. पाहुयात यामागचं कारण...

Why does Kolkata police wear white uniform | देशभरात पोलिसांचा गणवेश खाकी, पण मग कोलकाता पोलीस पांढऱ्या रंगाचा का घालतात? कारण असं जे माहीत नसेल

देशभरात पोलिसांचा गणवेश खाकी, पण मग कोलकाता पोलीस पांढऱ्या रंगाचा का घालतात? कारण असं जे माहीत नसेल

Kolkata Police Uniform : पश्चिम बंगालमध्ये सध्या निवडणुका सुरू असून येथील राजकारणाच्या वेगवेगळ्या चर्चाही सुरू आहेत. पश्चिम बंगालचा विषय निघाला की, कोलकाता शहराचा देखील उल्लेख होतोच. कोलकाता शहर आपल्या वेगळेपणासाठी नेहमीच चर्चेत असतं. येथील एक असं वेगळेपण आहे जे या शहराला देशातील सगळ्यात वेगळ शहर ठरवतं. आपल्याला माहीत आहेत की, लोकांच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिसांचा गणवेश हा खाकी रंगाचाच असतो. देशातील कोणत्याही कोपऱ्यात जाल तर पोलीस खाकी कपड्यांमध्येच दिसतील. पण आपल्याला माहीत नसेल की, कोलकाता हे एकुलतं एक असं शहर आहे जिथे पोलिसांचे कपडे पांढऱ्या रंगाचे असतात. पाहुयात यामागचं कारण...

इतिहासात दडली आहे पानंमुळं

कोलकात्यातील पोलिसांना पांढरे कपडे असतात याची मुळं १६९० मध्ये जुळतात. या काळात जॉब चारनॉक या भागात आले होते आणि त्यांनीच आधुनिक कोलकात्याचा पाया रचला होता. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने जसजसा आपला आवाका आजूबाजूच्या गावांमध्ये वाढवला, तेव्हा इथे पोलीस व्यवस्थेची गरज भासू लागली होती. १८४५ मध्ये जेव्हा कोलकात्यामध्ये पोलीस व्यवस्थेचा पाया रचला जात होता, तेव्हा ब्रिटिशांनी आपल्या पोलिसांना एक वेगळी ओळख देण्याचा विचार केला. यासाठी पोलिसांच्या कपड्यांचा रंग पांढरा ठेवण्यात आला. हाच पांढरा गणवेश आजही कायम ठेवण्यात आलाय. 

वातावरणही एक कारण

कोलकातामधील वातावरण फार वेगळं असतं. इथे फार उष्ण, घाम आणणारं आणि थकवा देणारं वातावरण असतं. जर वैज्ञानिक दृष्टीने पहायचं तर पांढरा रंग सूर्यप्रकाशाला रिफ्लेक्ट करतो आणि उष्णता अब्जॉर्ब करतो. अशात पोलिसांसाठी हा रंग अधिक आरामदायक आणि फायदेशीर ठरतो. या कपड्यांमुळे ते जास्तवेळ बाहेर राहून काम करू शकतात. याउलट खाकीसारख्या रंगाने जास्त गरम होतं. हा रंग या वातावरणासाठी जास्त चांगला नसतो. 

राज्य पोलिसांना वेगळी ओळख

पश्चिम बंगालमधील पोलिसांना देशातील जास्तीत जास्त राज्यांप्रमाणे मानक खाकी गणवेश आहे. कोलकाता पोलिसांना पांढऱ्या रंगाचा गणवेश असल्याने लोकांना शहर पोलीस आणि राज्य पोलिसांमध्ये फरक करण्यासही मदत मिळते.

खाकी रंग कसा निवडला गेला? 

खाकी गणवेशाची आपली एक वेगळी ओळख आहे. हा प्रस्ताव १८४७ मध्ये भारतात ब्रिटिश शासनादरम्यान हॅरी लम्सडेन यांनी दिला होता. यामागचा विचार फार सरळ होता. पांढरे कपडे लवकर मळतात, पण खाकी रंगावर डाग, धूळ जास्त दिसून येत नाही.

Web Title : कोलकाता पुलिस क्यों पहनती है सफेद वर्दी, जबकि देशभर में खाकी?

Web Summary : कोलकाता पुलिस सफेद वर्दी ब्रिटिश शासनकाल और शहर की गर्म, उमस भरी जलवायु के कारण पहनती है। यह रंग उन्हें राज्य पुलिस से अलग करने में भी मदद करता है, जो खाकी पहनते हैं। खाकी गंदगी को बेहतर ढंग से छुपाती है, जिसे बाद में अपनाया गया।

Web Title : Why Kolkata Police wear white uniforms, unlike khaki nationwide?

Web Summary : Kolkata Police wear white due to historical reasons dating back to British rule and the city's hot, humid climate. The color also helps distinguish them from state police who wear khaki. Khaki hides dirt better, adopted later.