शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या डब्यांवर का असतात निळ्या-पिवळ्या-पांढऱ्या रंगांच्या रेषा? अनेकांना नसेल माहीत त्यांचा अर्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 15:32 IST

Train Stripes Meaning : रेल्वेच्या डब्यांवरील या लाईन्स डिझाइनसारख्या वाटू शकतात. पण मुळात या लाईन्स डिझाइन नसून एक स्मार्ट व्हिज्युअल कम्युनिकेशन सिस्टीम आहे. 

Train Stripes Meaning : आपण जर नियमितपणे रेल्वेने प्रवास करत असाल तर पाहिलं असेल की, काही रेल्वेमध्ये वेगवेगळ्या रंगांचे डबे असतात. या वेगळ्या रंगाच्या डब्यांनाही अर्थ असतो. त्यासोबतच काही डब्यांवर आपण निळ्या, पिवळ्या, पांढऱ्या, हिरव्या आणि लाल रंगांच्या लाईन्सही पाहिल्या असतील. रेल्वेच्या डब्यांवरील या लाईन्स डिझाइनसारख्या वाटू शकतात. पण मुळात या लाईन्स डिझाइन नसून एक स्मार्ट व्हिज्युअल कम्युनिकेशन सिस्टीम आहे. 

निळ्या किंवा लाल डब्यांवर असलेल्या या पिवळ्या लाईन्स अशा डब्यांवर असतात, जे डबे दिव्यांग प्रवासी किंवा ज्यांना मेडिकल मदतीची गरज असते त्यांच्यासाठी आरक्षित असतात. या डब्यांमध्ये बसण्याची खास व्यवस्था आणि सुलभ शौचालय असतं. 

निळ्या डब्यांच्या शेवटच्या खिडकीवर असलेली एक पांढरी लाईन दर्शवते की, हा डबा जनरल आहे. हलक्या निळ्या किंवा मग भुरक्या डब्यांवर असलेल्या हिरव्या लाईन्स दर्शवतात की, हा डबा खासकरून महिलांसाठी आरक्षित आहे. गर्दीत हा व्हिज्युअल संकेत खूप मदतीचा ठरतो.  भुरक्या रंगाच्या डब्यावरील लाल लाईन्स दर्शवतात की, हा डबा फर्स्ट क्लासचा आहे. असा लाईन्स सामान्यपणे मुंबई लोकल नेटवर्कमध्ये बघायला मिळतात. निळ्या डब्यांना इंटीग्रल कोच फॅक्टरी डबा म्हटलं जातं. हे पारंपारिक डबे आहेत, ज्यांचा वापर पूर्ण भारतीय रेल्वेमध्ये केला जातो आणि हे सामान्यपणे मध्यम गतीने धावतात. लाल रंगाचे डबे लिंके हॉफमॅन बुश श्रेणीचे असतात. हे फार अॅडव्हान्स आणि सुरक्षित असतात. यांचा वापर जास्तकरून राजधानी आणि शताब्दी एक्सप्रेससारख्या प्रीमिअम रेल्वेंमध्ये केला जातो.

English
हिंदी सारांश
Web Title : Decoding Indian Railways: Meaning of Colored Stripes on Train Coaches

Web Summary : Train stripes aren't mere designs! Yellow indicates reserved seats for disabled/medical needs. White marks general compartments. Green signifies women-only coaches, and red denotes first-class on local trains. Blue coaches are standard; red are advanced.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सIndian Railwayभारतीय रेल्वेJara hatkeजरा हटके