शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल संकटातून दिलासा मिळणार? अमेरिकेने रशियन तेलावरील सूट वाढवली; भारताला कसा होणार फायदा?
2
Top Marathi News LIVE: "महागाई मॅन आता आणखी वसुली करेल"; काँग्रेसची केंद्र सरकारवर टीका
3
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
4
एकाच महिलेचे ४ प्रियकर; सुपारी देऊनही नवरा वाचला, उशीने तोंड दाबून बेडवरच संपवला! ऐकून अंगावर येईल काटा
5
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
6
सेल्फी, लॅप ऑफ ऑनर आणि MS धोनी-रैना जोडीची खास भेट; चेपॉकवरील भावूक क्षण (VIDEO)
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
8
शिवराज मोटेगावकरच्या अटकेनंतर ‘सीबीआय’चा महाराष्ट्रातील मुक्काम वाढला, तपासणी सत्र सुरूच!
9
समुद्रात दादागिरी! इराणने 'होर्मुझ स्ट्रेट'वर लागू केला स्वतःचा कायदा; एका जहाजाकडून वसूल करताहेत 'इतके' कोटी
10
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
11
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
12
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
13
अधिक मास २०२६: अधिक महिन्यात विवाहित मुलीने आईची ओटी का भरावी? सविस्तर वाचा
14
मधुचंद्राच्या रात्री असं काय घडलं की नवरदेवाने दुसऱ्याच दिवशी आयुष्य संपवलं? नवरीसह ४ जणांवर गुन्हा दाखल!
15
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
16
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
17
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
18
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
19
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
20
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
Daily Top 2Weekly Top 5

वटवाघुळे उलटी लटकून झोपलेली पाहिली असतीलच, पण यामागचं नेमकं कारण काय असतं पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 16:25 IST

Why Bats Sleep Upside Down : आपल्याही मनात कधीना कधी प्रश्न आला असेल की, वटवाघुळे उलटी का लटकलेली असतात? यामागचं नेमकं कारण काय असतं, हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

Why Bats Sleep Upside Down : कोरोना काळात वटवाघुळांची चांगलीच चर्चा झाली. वटवाघुळांच्या काही प्रजातीमधून कोरोना व्हायरल पसरल्याचं बोललं जात होतं. तशी वाटवाघुळे नेहमीच चर्चेचा विषय असतात. लोकांच्या त्यांच्याबाबत बरीच उत्सुकता असते. शहरांमध्ये एखाद्या बिल्डींगच्या छताला किंवा गावा-खेड्यांमध्ये झाडांवर उलटी लटकलेली वटवाघुळे आपण अनेकदा पाहिली असतील. तेव्हा आपल्याही मनात प्रश्न आला असेल की, वटवाघुळे उलटी का लटकलेली असतात? यामागचं नेमकं कारण काय असतं, हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

उलटे लटकून का झोपतात?

वटवाघुळांच्या झोपण्याच्या प्रश्नासोबत इतर पक्ष्यांप्रमाणे वटवाघुळे जमिनीवरून का उडू शकत नाहीत? असाही प्रश्न काही लोकांना पडतो. तर याचं कारण त्यांच्या पंखांमुळे मोठी झेप घेता येत नाही आणि त्यांचे मागचे पाय इतके लहान व अविकसित असतात की, धावून वेग पकडू शकत नाहीत. उलटे लटकून राहिल्यावरच त्यांना सहजपणे झेप घेता येते. वटवाघुळे सामान्यपणे अंधार असलेल्या गुहांमध्ये राहतात. ते रात्रीच बाहेर निघतात. ते झोपलेले असताना खाली का पडत नाही याचं कारण म्हणजे त्यांच्या पायांची खास बनावट. पायांचे पंजे त्यांचं वजन उचलण्यास मदत करतात.

वटवाघुळांची बनावट ही वातावरणाच्या हिशेबाने होते. काही वटवाघुळांचे पंख लांब असतात. हे लाल, काळे आणि पांढरे असतात. थायलॅंडमधील भौरा वटवाघुळे सगळ्यात कमी वजनाचे असतात. इंडोनेशियात आढळणारे वटवाघुळे 6 फुटापर्यंत पंख पसरतात. लॅटिन अमेरिकेत आढळणारे 70 टक्के वटवाघुळे केवळ रक्त पितात. कॅनडामध्ये आढळणारे वटवाघुळे कीटक खातात.

डायनॉसॉरच्या आधीपासूनचं अस्तित्व

असं सांगितलं जातं की, वटवाघुळांचं अस्तित्व डायनॉसॉरच्या आधीपासून होतं. ते सगळ्यात जास्त तापमान असलेल्या वाळवंटातही राहतात आणि सगळ्यात थंड प्रदेशातही राहतात. त्यांच्या वेगवेगळ्या प्रजातीही असतात. यांच्यात काही अद्भुत क्षमताही असतात. मेक्सिकन वटवाघुळे उंच उडू शकतात. तर लहान भुरक्या रंगाचे वाटवाघुळे झोपतात बघून वाटतं ते श्वास घेतच नाहीयेत.

काहींमध्ये खास सेन्सर

मासे पकडणाऱ्या वटवाघुळांमध्ये एक खास सेंसर असतं, त्यामुळे त्यांना इतर जीवांच्या तुलनेत मासे लवकर दिसतात. काही वटवाघुळांचे पंख मनुष्यांच्या केससारखे पातळ असतात. वटवाघुळांचा रंग केवळ काळा नसतो तर होंडुरन नावाचे वटवाघुळे पांढरे असतात. त्याचं नाक पिवळं असतं.

English
हिंदी सारांश
Web Title : Why Bats Sleep Upside Down: Unveiling the Mystery Explained

Web Summary : Bats hang upside down due to underdeveloped legs, aiding flight. Their feet lock onto surfaces, preventing falls. Diverse species exist, with varied diets and habitats, some dating back to dinosaur times. They possess unique sensory abilities.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके