लख्खं प्रकाश, उघडे दरवाजे आणि जवळची लोकं दिसतात दिसणे, मृत्युआधी लोकांना 'अशी' स्वप्ने दिसतात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 14:50 IST2026-04-19T14:49:46+5:302026-04-19T14:50:18+5:30
Dreams before death : मृत्युच्या दारात उभ्या असलेल्या व्यक्तीला काय दिसतं, काय जाणवतं? रिसर्चमधून समोर आल्यात अनेक गोष्टी.

लख्खं प्रकाश, उघडे दरवाजे आणि जवळची लोकं दिसतात दिसणे, मृत्युआधी लोकांना 'अशी' स्वप्ने दिसतात
Dreams before death : मृत्युच्या आधी व्यक्तीला काय वाटतं, काय जाणवतं, काय दिसतं या गोष्टींबाबत अनेकदा वेगवेगळे खुलासे समोर येत असतात. मुळात लोकांना सुद्धा या गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता असते. आता या गोष्टींवरून एका रिसर्चमधून काही खुलासे करण्यात आलेत. आयुष्याच्या शेवटच्या घटकांमध्ये व्यक्तीला अनेकदा स्वप्ने पडतात. ही स्वप्ने कुटुंबियांची, प्रकाशाची किंवा नव्या प्रवासाची असतात. ही स्वप्ने व्यक्तीच्या भावना, भीती आणि मानसिक स्थितीला दर्शवतात.
हा रिसर्च इटलीच्या आरोग्य विभाग रेजियो एमिलियाच्या IRCCS मधील संशोधकांनी केला. त्यांनी २३९ लोकांसोबत संवाद साधला. ज्यात डॉक्टर, नर्स, सायकॉलॉजिस्ट आणि रूग्णांची शेवटच्या क्षणांमध्ये काळजी घेणारे लोक यांचा समावेश होता. या लोकांनी खुलासा केला की, मृत्युच्या दारात असलेले रूग्ण अनेकदा काही खास स्वप्ने आणि दृश्य बघतात.
स्वप्ने काय असतात?
स्वप्ने ही आपल्या मेंदूद्वारे झोपेदरम्यान बनवण्यात आलेले सीन, भावना आणि विचार असतात. प्रत्येक व्यक्ती रोज स्वप्ने बघतात. भलेही ते लक्षात राहत नाहीत. स्वप्ने आपल्याला आपल्या भावना समजण्यास, आठवणी सांभाळण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत करतात.
कशी स्वप्ने येतात?
- अनेक रूग्णांनी सांगितलं की, त्यांना आपले मृत नातेवाईक किंवा जवळच्या व्यक्ती स्वप्नात दिसतात. ही स्वप्ने अनेकदा दिलासा देणारी असतात. जसे की, एका रूग्णाला स्वप्नात दिसलं की, तिचा पती तिला म्हणत आहे की, मी तुझी वाट बघत आहे. याने तिला शांत वाटलं.
- काही लोकांनी सांगितलं की, त्यांना स्वप्नात लख्खं प्रकाश, उघडे दरवाजे आणि पायऱ्या दिसल्या. एका महिलेने सांगितले की, ती लख्खं प्रकाश असलेल्या दरवाज्याकडे जात होती.
- काही स्वप्ने फार शांत आणि चांगली असतात. जसे की, समुद्र किनारी धावणारा घोडा किंवा सुंदर निसर्ग. अशा स्वप्नांनी रूग्णाला बरं वाटतं.
- प्रत्येक स्वप्न चांगलं नसतं. काही रूग्णांना खतरनाक दृश्य दिसतात. जसे की, एक राक्षस दिसला, जो त्याना खेचतोय.
असं का होतं?
वैज्ञानिकांचं मत आहे की, जर एखाद्या व्यक्तीला गंभीर आजार असेल, त्याना जास्त तणाव, भीती आणि भावनात्मक दबाव असतो. यामुळे स्वप्ने जास्त स्पष्ट आणि लक्षात राहणारे असतात. अशी स्वप्ने अनेकदा मनाला दिलासा देण्याचं काम करतात. खासकरून तेव्हा जेव्हा व्यक्तीने आपली लोकं गमावली असतील, अशात त्यांना एकटं वाटत नाही आणि मानसिक शांतता मिळते.