नव्या गाडीच्या चावीसोबत का दिला जातो मेटल टॅग? चुकूनही करू नका फेकण्याचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 15:28 IST2026-04-28T14:55:16+5:302026-04-28T15:28:51+5:30

जास्तीत जास्त लोकांना याचं नेमकं काम माहीत नसतं. तो कशासाठी दिला जातो हेही माहीत नसतं. पण हाच छोटासा मेटल टॅग आपल्या गाडीसाठी खूप महत्वाचा असतो. तो कसा हे समजून घेऊयात.

What is the importance of metal tag attacked with new bike | नव्या गाडीच्या चावीसोबत का दिला जातो मेटल टॅग? चुकूनही करू नका फेकण्याचा विचार

नव्या गाडीच्या चावीसोबत का दिला जातो मेटल टॅग? चुकूनही करू नका फेकण्याचा विचार

आपण पाहिलं असेल की, जेव्हा आपण एखादी नवीन बाइक किंवा गाडी खरेदी करतो तेव्हा चावीसोबत एक छोटा मेटल टॅगही मिळतो. बरेच लोक याला निकामी समजून फेकतात. पण जास्तीत जास्त लोकांना याचं नेमकं काम माहीत नसतं. तो कशासाठी दिला जातो हेही माहीत नसतं. पण हाच छोटासा मेटल टॅग आपल्या गाडीसाठी खूप महत्वाचा असतो. तो कसा हे समजून घेऊयात.

मेटल टॅग फार महत्वाचा

नव्या गाडीच्या चावीसोबत मिळणारा हा मेटल टॅग चावीचा कोड म्हणजे नंबर असतो. यावर काही अंक किंवा अल्फान्यूमेरिक कोड कोरलेले असतात. हा कोड आपल्या गाडीच्या चावीची यूनिक ओळख असतो. प्रत्येक गाडीच्या चावीचा कोड वेगवेगळा असतो. मॅन्यूफॅक्चरर हा टॅग देतात, कारण आपली गाडीची चावी हरवली तर सहजपणे नवीन चावी बनवता यावी. या कोडशिवाय नवीन चावी बनवणं फार अवघड आणि महागडं ठरू शकतं. डीलरला पूर्ण सिस्टीम खोलून चावीचं ब्लेड मोजावं लागतं. सॉफ्टवेअरने कोड काढावा लादतो. या पूर्ण प्रक्रियेला ८ हजार ते २५ हजार रूपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. जर कोड असेल तर १५०० ते ४००० हजार रूपयांमध्ये काम होऊ शकतं.

बऱ्याच बाइक कंपन्यांसाठी हा टॅग खूप महत्वाचा असतो. काही मॉडल्समध्ये चावीमध्ये ट्रान्सपॉन्डर चिप लावलेली असते. अशात कोडशिवाय नवीन चावी तयार करणं आणखी अवघड होतं. अनेकदा डीलरला पूर्ण सेट बदलावा लागतो. एक्सपर्ट सल्ला देतात की, चावी मिळताच हा टॅग काढून घरात सुरक्षित ठिकाणी ठेवावा. अनेक लोक याला सर्व्हिस बुक किंवा इन्शुरन्स पेपरसोबत ठेवतात. जर आपल्याला गाडीच्या चावीसोबत हा टॅग दिला नाही तर डीलरकडे त्यासाठी मागणी करू शकता. ते गाडीचा चेसिस नंबर आणि इंजिन नंबर बघूनही कोड काढू शकतात. ही प्रक्रिया लांब आणि महागडी असते. 


आता आलाय टॅगलेस कोड

हल्ली जास्तीत जास्त मॉडल्समध्ये स्मार्ट की आणि कीलेस एन्ट्री सिस्टीम येत आहेत. यातही मेटल टॅग किंवा डिजिटल कोड दिला जातो. काही कंपन्या आता डिजिटल सर्व्हिस बुकसोबत कोडही ऑनलाईन सेव्ह करत आहेत. पण जास्तीत जास्त केसेसमध्ये जुना मेटल टॅगच अधिक विश्वासक ठरतो. हा टॅग गमावल्याचं किंवा फेकल्याचं महत्व तेव्हाच समजतं, जेव्हा चावी हरवते. जर टॅग नसेल तर अडचण अधिक वाढते. त्यामुळे हा टॅग जपून ठेवा.

Web Title : नई गाड़ी की चाबी के साथ मिलने वाले टैग को न फेंके; यह बहुत महत्वपूर्ण है!

Web Summary : अपनी नई कार की चाबी के साथ मिलने वाला छोटा मेटल टैग बहुत ज़रूरी है। इसमें चाबी का कोड होता है, जिससे चाबी खो जाने पर उसे आसानी से बदला जा सकता है, जिससे काफ़ी खर्च बचता है। इसे सुरक्षित रखें!

Web Title : Don't Discard New Car's Key Tag; It's More Important Than You Think!

Web Summary : That small metal tag with your new car key is vital. It holds the key code, enabling easy replacement if the key is lost, saving significant costs. Store it safely!