काही लोक विषारी कोब्राने दंश करूनही जिवंत राहतात, ते स्वत:हून वाचवतात काहींचा जीव...कसा ते पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 14:58 IST2026-04-24T14:55:48+5:302026-04-24T14:58:10+5:30
Cobra Facts : आपल्याला कल्पना नसेल, पण ज्या लोकांना कोब्रा दंश करतो, त्यातील २० ते ३० टक्के लोक त्याच्या दंशानंतरही मरत नाहीत. त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे कोब्राला स्वत:च त्यांना मारायचं नसतं.

काही लोक विषारी कोब्राने दंश करूनही जिवंत राहतात, ते स्वत:हून वाचवतात काहींचा जीव...कसा ते पाहा...
Cobra Facts : सामान्यपणे सगळ्यांमध्ये असाच समज आहे की, जर कोब्राने कुणाला हलका दंश जरी केला तर त्याचा जागीच जीव जाईल. कोब्राचं विष इतक खतरनाक असतं की, काही क्षणात व्यक्तीचा जीव घेतं. पण आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल की, कोब्राने दंश केलेले २० ते ३० टक्के लोक असेही असतात, ज्यांच्या जीवाला काहीच होत नाही. याचं कारण हे आहे की, हा सगळ्यात विषारी सापच, त्यांना जीवनदान देतो. आपल्याला कल्पना नसेल, पण ज्या लोकांना कोब्रा दंश करतो, त्यातील २० ते ३० टक्के लोक त्याच्या दंशानंतरही मरत नाहीत. त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे कोब्राला स्वत:च त्यांना मारायचं नसतं. आता तुम्ही म्हणाल की, असं कसं? त्याचं विष सगळ्यात घातक असतं. तर कोब्रा काहींना एका खास पद्धतीने दंश करतो, ज्यामुळे ते लोक फक्त बेशुद्ध होतात. त्यांचा जीव जात नाही. आता हे कसं होतं हे समजून घेऊया.
कोब्राने दंश केल्यावरही काही लोकांचा जीव जात नाही, याचं मुख्य कारण म्हणजे त्याचा ड्राय बाईट म्हणजे ड्राय दंश असतं. म्हणजे दंश केल्यावर त्याच्या दाताचे ठसे तर शरीरावर दिसतात, पण शरीरात त्याच्या विषाचा एक थेंबही जात नाही. याचं कारण म्हणजे कोब्रा तेव्हा आपलं विष बाहेर काढत नाही. त्याचा हा दंश ड्राय बाईट असतो.
सापांचा ड्राय बाईट काय असतो?
सापांचा ड्राय बाईट ही एक अशी स्थिती असते, ज्यात तो एखाद्या व्यक्तीला दंश तर करतो, पण आपलं विष त्याच्या शरीरात सोडत नाही. दंशाचे ठसे असतात, ज्यामुळे वेदना आणि सूज येते. पण विष शरीरात पसरत नाही. याला बिनविषारी सापाचा दंश असंही म्हटलं जातं. हे काम कोब्रा सुद्धा ३० टक्के केसेसमध्ये करतो.
कितीदा ड्राय बाईट करू शकतो कोब्रा?
एक्सपर्ट सांगतात की, कोब्रा साधारणपणे २० ते ३० टक्के केसेसमध्ये ड्राय बाईट करतो. म्हणजे तो दंश करतोच, पण विष सोडत नाही. सामान्यपणे कोब्रा आपल्या जीवनात चार ते पाच वेळा ड्राय बाईट करू शकतो.
ड्राय बाईटची लक्षणं
सापाच्या ड्राय बाईटनंतर दातांचे ठसेही दिसतात, वेदनाही होतात. पण विषामुळे होणारी लक्षणं जसे की, उलटी, श्वास घेण्यास त्रास, पक्षाघात ही दिसत नाहीत. तरी सुद्धा ड्राय बाईटला हलक्यात घेता येणार नाही. कारण याने इन्फेक्शन आणि इतर गंभीर समस्या होऊ शकतात.
ड्राय बाईट कशासाठी?
- विष ग्रंथीमध्ये विष कमी असणं किंवा विष पिशवी रिकामी असणं.
- काही साप विषाचं प्रमाण नियंत्रित करतात म्हणजे साप मुद्दाम कमी किंवा विष सोडत नाही. जेणेकरून विष शिल्लक रहावं.
- विष ग्रंथीमध्ये किंवा नळीमध्ये काहीतरी इन्फेक्शन असणं.
- धोक्याचा संकेत देण्यासाठी दंश करणे. म्हणजे हा दंश केवळ घाबरवण्यासाठी किंवा इशारा देण्यासाठी असतो.
- तसेच सापाचं वयही महत्वाचं ठरतं. तरूण साप अनेकदा पूर्ण प्रमाणात विष सोडतात, तर वयस्क साप विषाचं प्रमाण नियंत्रित करतात.