अस्थी विसर्जन करण्यासाठी अमेरिकेतून आला अन् भारतीय मुलीच्या प्रेमात पडला; पुढे झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 03:19 PM2023-01-02T15:19:43+5:302023-01-02T15:28:11+5:30

अस्थी विसर्जन करण्यासाठी निखिल अमेरिकेतून भारतात आला आणि भारतीय मुलीच्या प्रेमात पडला आहे. 

us boy meets indian girl in goa on new year eve that changed destiny of both | अस्थी विसर्जन करण्यासाठी अमेरिकेतून आला अन् भारतीय मुलीच्या प्रेमात पडला; पुढे झालं असं काही...

फोटो - आजतक

Next

आयुष्यात अचानक कोणाशी तरी भेट होते आणि मग तिच भेट संपूर्ण आयुष्य बदलण्यासाठी कारणीभूत ठरते. अशीच एक घटना आता समोर आली आहे. निखिल आणि हिरवासोबत असंच काहीसं घडलं आहे. दोघांचा व्यवसाय आणि देश वेगळा, तरीही दोघे एकत्र आले. त्यांची पहिली भेट काही वर्षांपूर्वी झाली. अस्थी विसर्जन करण्यासाठी निखिल अमेरिकेतून भारतात आला आणि भारतीय मुलीच्या प्रेमात पडला आहे. 

2010 मध्ये निखिल मेडिकल स्कूलचा विद्यार्थी होता. कर्करोगामुळे त्याने आपले वडील गमावले होते. वडिलांचे अस्थी विसर्जन करण्यासाठी तो भावासोबत अमेरिकेतून भारतात आला. निखिलने सांगितले की, त्याचे कुटुंब अमेरिकेत राहत होते, परंतु त्याने आणि त्याच्या भावाने वडिलांच्या अस्थी त्यांच्या गावी विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. यानंतर दोन्ही भाऊ गोव्याला ट्रीपसाठी गेले. त्यांचा एक जूना मित्रही सोबत होता. 

टिटोज या क्लबमध्ये त्यांनी जायचं होतं. क्लबमध्ये पोहोचल्यावर त्यांना कळले की प्रत्येक पुरुषाला एंट्री फी भरावी लागते, तर महिलांना मोफत प्रवेश मिळत होता. 21 डिसेंबर 2010 रोजी सुमारे 20 वर्षांची हिरवा तिच्या दोन मित्रांसह तेथे आली होती. ती भारतात राहून बिझनेस स्कूलमध्ये शिकत होती. त्याचवेळी त्यांना निखिल आणि त्याचा ग्रुप दिसला. हिरवाच्या मैत्रिणींनी या ग्रुपशी बोलायचं ठरवलं, त्यानंतर दोन्ही ग्रुपने एकमेकांशी संवाद साधला. 

हिरवा आणि निखिल पहिल्यांदा भेटले तेव्हा दोघांनी एकत्र डान्स केला. अनेक तास एकत्र राहिले. रात्र संपणार होती तेव्हा निखिलने हिरवाचा नंबर मागितला पण सुरक्षेच्या कारणास्तव तिने तिचा नंबर कोणत्याही अनोळखी व्यक्तीला न देण्याचा निर्णय घेतला. दोघेही आपापल्या मार्गाने गेले पण त्यांच्या मित्रांनी त्यांचे डिटेल्स एकमेकांना शेअर केले होते, त्यामुळे निखिलला हिरवाचा नंबर मिळाला. त्याने हिरवाला मेसेज करून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

निखिलने यानंतर हिरवाला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. मग त्याच गाण्याच्या 'ब्रेक युवर हार्ट' या गाण्याचे स्टेटस टाकले, ज्यावर त्याने क्लबमध्ये निखिलसोबत डान्स केला. यानंतर दोघांमध्ये मेसेज, नंतर कॉल आणि नंतर व्हिडिओ कॉलवर तासनतास संवाद सुरू झाला. निखिलने भारतात येऊन हिरवाच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि हिरवा निखिलच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी अमेरिकेला गेला. वर्षभरानंतर 2012 मध्ये दोघांनी लग्न केले. आता दोघेही अमेरिकेत राहतात आणि त्यांना तीन मुले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: us boy meets indian girl in goa on new year eve that changed destiny of both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.