विद्यार्थीनीला सोडावं लागलं भाड्याचं घर, मालकाने सांगितलं तिच्याकडील 'या' विचित्र गोष्टीची भीती वाटते

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 19:18 IST2021-09-23T19:16:58+5:302021-09-23T19:18:47+5:30

जेव्हा विद्यार्थी बाहेरगावी शिक्षणासाठी जातात तेव्हा त्यांना अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागतो. एका विद्यार्थीनीला याची प्रचिती आली. पण ज्या कारणासाठी तिला तिचं भाड्याचं घर खाली करावं लागलं ते वाचून तुम्हाला धक्काच बसेल.

owner asked medical student girl in Canada to leave house because of her tattoo | विद्यार्थीनीला सोडावं लागलं भाड्याचं घर, मालकाने सांगितलं तिच्याकडील 'या' विचित्र गोष्टीची भीती वाटते

विद्यार्थीनीला सोडावं लागलं भाड्याचं घर, मालकाने सांगितलं तिच्याकडील 'या' विचित्र गोष्टीची भीती वाटते

जेव्हा विद्यार्थी बाहेरगावी शिक्षणासाठी जातात तेव्हा त्यांना अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागतो. एका विद्यार्थीनीला याची प्रचिती आली. पण ज्या कारणासाठी तिला तिचं भाड्याचं घर खाली करावं लागलं ते वाचून तुम्हाला धक्काच बसेल. कॅनडाच्या (Canada) टोरंटो (Toranto) येथे मेडिकल स्टूडंट (Medical Student) असल्या कॅडिंस बॉल हिच्यासोबतही असा किस्सा घडला ज्याची तुम्ही कल्पनाही करु शकत नाही.

कॅडिंस बॉलनं नुकतंच ओंटारियोच्या (Ontario) वेस्टर्न युनिव्हर्सिटीमध्ये (Western University) मेडिकल सायनसच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे. The Sun च्या वृत्तानुसार, कॅडिंसनं राहण्यासाठी ऑनलाईन साईटवर घर शोधलं. घर नक्की झालं अन् रेंट अ‍ॅग्रीमेंटही तयार होतं. मात्र, यानंतर अशा कारणामुळे तिला हे घर सोडावं लागलं, ज्याची तिनं कल्पनाही केलेली नव्हती.

तिच्या घरमालकानं अचनाकच हे अ‍ॅग्रीमेंट कॅन्सल झाल्याचं म्हटलं. तरुणीनं याच कारण विचारलं आणि काही अडचण असेल तर चर्चा करून सोडवू असंही म्हटलं. मात्र, घरमालक काहीही ऐकायला तयार नव्हता. इतकंच नाही तर लवकरात लवकर हे घर सोड असंही त्यानं तरुणीला सांगितलं. 

अखेर या तरुणीला हे घर रिकामं करावं लागलं. मात्र, नंतर तिला घरमालकानं आपल्याला घरातून बाहेर का काढलं, याचं कारण समजलं. घरमालकाला आपल्या हातावरील टॅटू (Tattoo) आवडत नसल्यानं त्यानं हे केल्याचं तिनं सांगितलं. या तरुणीच्या शरीरावर भरपूर टॅटू होते. हे टॅटू पाहून घरमालकाला भीती वाटत असे. अशात त्यांना रोज कॅडिंसला आपल्या समोर पाहण्याची इच्छा नव्हती. आपले टॅटूच आपल्यावरील एवढ्या संकटाचं कारण बनतील याचा या तरुणीनं कधी विचारही केला नव्हता. मात्र, घरमालकाच्या अजब वागण्यामुळे तिला बेघर व्हावं लागलं.

Web Title: owner asked medical student girl in Canada to leave house because of her tattoo