सलाम! दिवसा नोकरी अन् रात्री सायकलवर फूड डिलिव्हरी करून स्वप्नांसाठी राबतोय हा इंजिनिअर

By Manali.bagul | Published: November 2, 2020 06:41 PM2020-11-02T18:41:37+5:302020-11-02T18:51:23+5:30

Inspirational Stories Marathi: मागच्या तीन वर्षांपासून सकाळी १० ते ५ इंजिनिअरची नोकरी करत होता. ही नोकरी करत असताना त्यानं पार्ट टाईम जॉब करण्याचे ठरवले. 

Meet this engineer from karnataka who food delivery at night for cycling | सलाम! दिवसा नोकरी अन् रात्री सायकलवर फूड डिलिव्हरी करून स्वप्नांसाठी राबतोय हा इंजिनिअर

सलाम! दिवसा नोकरी अन् रात्री सायकलवर फूड डिलिव्हरी करून स्वप्नांसाठी राबतोय हा इंजिनिअर

googlenewsNext

मेहनत करून यशाचं शिखर गाठत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांची कहाणी तुम्ही ऐकून असाल. सायकलिंगची आवड असलेल्या एका तरूणाची गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा तरूण सकाळी इंजिनिअरची नोकरी आणि रात्री फूड डिलिव्हरी करण्याचे काम करतो. या तरूणाला सायकलिंगची आवड लहानपणापासून आहे. मागच्या तीन वर्षांपासून सकाळी १० ते ५ इंजिनिअरची नोकरी करत होता. ही नोकरी करत असताना त्यानं पार्ट टाईम जॉब करण्याचे ठरवले.

 गेल्या वर्षी  मे महिन्यात त्याने झोमॅटोचा पार्ट टाईम जॉब करायचं ठरवलं.  संध्याकाळच्या वेळेत तो झोमॅटोच्या माध्यमातून फूड डिलिव्हरी करून लोकांपर्यंत अन्नपदार्थ पोहोचतो. ऑफिसचं काम झाल्यानंतर आपल्या सायकलवर झोमॅटोचं काम करायला सुरूवात करतो. रात्री उशिरापर्यंत हा तरूण फूड डिलिव्हरी करण्यासाठी सायकलिंग करतो. 

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार राजेश गेल्या १० वर्षांपासून सायकलवर लांबच लांब प्रवास करत आहे. २०१२-१६ मध्ये कॉलेजचं शिक्षण घेत असताना राजेशने अनेकदा सायकलिंग केले. सायकल रेसिंगमध्ये भागही घेतला. आतापर्यंत १ हजार ५०० फूड डिलिव्हरीज केल्या असून १० हजार किलोमीटर सायकल चालवली आहे. एके दिवशी राजेशने जवळपास १८३ किलोमीटर सायकल चालवली होती. त्यासाठी २० तासांचा वेळ लागला असून एकूण २९ फूड डिलिव्हरीज् त्या दिवशी केल्या होत्या. या राईड दरम्यान राजेशला फारसे पैसै मिळाले नव्हते. पण सलग इतका वेळ सायकल चालवल्याने एक मस्त अनुभव मिळाल्याचे राजेशने सांगितले. कौतुकास्पद! शिल्पकारानं बनवला ४० तास तेवत राहणारा मातीचा दिवा, अन् मिळवला राष्ट्रीय पुरस्कार

सायकलिस्ट लोकांना संधी मिळणार

झोमॅटोच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार,''भविष्यात सायकलिस्ट लोकांना जास्तीत जास्त संधी दिली जाणार आहे. राजेशसारख्या मुलांकडे पाहिलं तर दिसून येतं की, आपली स्वप्न आपल्याला कधीही झोपू देत नाहीत. तुम्ही कोणताही जॉब करत असाल तरी स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्यासाठी मेहनत करणं, काम करणं महत्वाचं असतं. काय सांगता? भिकारी महिलेच्या अकाऊंटमध्ये सापडले तब्बल दीड कोटी रुपये, अन् मग.....

Web Title: Meet this engineer from karnataka who food delivery at night for cycling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.