व्यक्तीचा आवाज बदलला होता, डॉक्टरांनी पाहिलं तर दिसला भयावह जीव...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 10:15 IST2024-03-11T10:15:23+5:302024-03-11T10:15:56+5:30
व्यक्तीने ही समस्या सामान्य समजून याकडे दुर्लक्ष केलं. पण एक दिवस त्याच्या तोंडातून रक्त येऊ लागलं होतं. त्यामुळे त्याला धक्का बसला.

व्यक्तीचा आवाज बदलला होता, डॉक्टरांनी पाहिलं तर दिसला भयावह जीव...
जगभरात लोकांना वेगवेगळ्या कंडिशनचा सामना करावा लागतो. टेस्ट केल्यानंतर डॉक्टरही हैराण होतात. अशीच एक घटना व्हिएतनाममधील एका व्यक्तीसोबत झाली. व्यक्तीला घशात वेदना होत होती आणि त्याचा आवाजही बदलला होता.
व्यक्तीने ही समस्या सामान्य समजून याकडे दुर्लक्ष केलं. पण एक दिवस त्याच्या तोंडातून रक्त येऊ लागलं होतं. त्यामुळे त्याला धक्का बसला. त्याने आरशात बघण्याचा प्रयत्न केला तर त्याला घशात एक वस्तू दिसली. तो घाबरून डॉक्टरांकडे गेला. इथे टेस्ट केल्यावर जे समोर आलं ते पाहून त्याला आणखी धक्का बसला. त्याच्या घशात जोंक म्हणजे एक रक्तपिपासू होता.
डॉक्टरांनी एक एंडोस्कोपी केली ज्यातून समजलं की, एक 6 सेंटीमीटर लांब जोंक घशात चिटकून आहे. तो श्वासनलिकेजवळ ग्लोटिसच्या खाली चिकटून आहे. त्याला काढण्यात आलं. सामान्यपणे याचं कारण तोंडाची किंवा शरीराची स्वच्छता कमी केल्याने असं होतं.
आता प्रश्न हा आहे की, या व्यक्तीच्या घशात जोंक गेला कसा? डॉक्टरांनी या व्यक्तीला याबाबत विचारलं तर त्याने आठवून असं उत्तर दिलं की, साधारण एक महिन्याआधी उंदराचा पिंजरा स्वच्छ करताना त्याच्या हाताला जखम झाली होती.
त्यावर उपचार म्हणून त्याने काही औषधी पानं चावून त्यांची पेस्ट तयार केली. जेणेकरून ती जखमेवर लावता येईल.
शक्यता आहे की, यादरम्यानच जोंक त्याच्या शरीरात गेला. डॉक्टरांनी यावर समजावलं की, पाने धुतल्याशिवाय ते तोंडात टाकणे मूर्खपणा आहे. ज्यामुळे छोटा जोंक शरीरात गेला. पण शरीरात गेल्यावर ते रक्त पित असल्याने वेगाने वाढतात.