शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

प्लेन क्रॅश झालं, ट्रेन दरीत कोसळली, कारमध्ये जळाला, तब्बल ७ वेळा भीषण अपघातातून असा वाचला 'हा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 18:51 IST

क्रोएशियातील फ्रेन सेलाकने (Frane Selak) मात्र एकदा-दोनदा नव्हे तर चक्क सात वेळा मृत्यूला चकवा दिला आहे. त्याचा मृत्यू होणार नाही, असं जणू त्याला वरदानच मिळालं आहे. त्याला जगातील सर्वात नशीबवान व्यक्ती मानलं जातं.

मृत्यू कधी, कुठे कसा येईल सांगू शकत नाही. मृत्यूवर कोणीही मात करू शकत नाही, त्याला हरवू शकत नाही. मृत्यू होणं न होणं आपल्या हातात नाही. असं असताना क्रोएशियातील फ्रेन सेलाकने (Frane Selak) मात्र एकदा-दोनदा नव्हे तर चक्क सात वेळा मृत्यूला चकवा दिला आहे. त्याचा मृत्यू होणार नाही, असं जणू त्याला वरदानच मिळालं आहे. त्याला जगातील सर्वात नशीबवान व्यक्ती मानलं जातं. (World luckiest man)

फ्रेनचा जन्म १९२९ साली क्रोएशियात झाला. नशीब घेऊनच तो जन्माला आला. फ्रेन ७ भयंकर अपघातातलून वाचला आहे. विमान, रेल्वे, बस आणि कार अशा सर्व गाड्यांच्या अपघातात तो सापडला.  पण त्याचं नशीब इतकं बलवत्तर की वारंवार त्याचा जीव वाचला. नशीबाने त्याला मृत्यूच्या दाढेतून वेळोवेळी बाहेर काढलं.

१९६२ साली एका ट्रेन दुर्घटनेतून तो बचावला. साराजेवाहून डबरोवनिक रेल्वे प्रवास करताना ट्रेन एका नदीत कोसळली. त्यावेळी तब्बल १७  प्रवाशांचा मृत्यू झाला. फ्रेनच्या एका हाताला फक्त दुखापत झाली. तो पोहोत नदीकिनारी आला.

यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी विमान दुर्घटनेतही तो सापडला. जाग्रेबहून रिझेकासाठी विमानाने टेक ऑफ केलं. त्यानंतर विमानापासून एक दरवाजा वेगळा झाला आणि दुर्घटना झाली. यामध्ये एकुण १९ जणांनी आपला जीव गमावला. पण फ्रेन एका गवताच्या ढिगाऱ्यावर बेशुद्धावस्थेत पडलेला सापडला. त्याला रुग्णालयात नेण्यात आलं, तिथं तो शुद्धीवर आला.

त्यानंतर १९६६ साली तो बसने प्रवास करत होता, तेव्हा बस नदीत कोसळली. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. पण फ्रेन वाचला.  १९७० फ्रेनच्या कारचं फ्युल टँक फुटलं होतं, तेव्हासुद्धा सुदैवाने फ्रेन त्यातून बचावला. १९७३ साली आणखी एक कार दुर्घटना झाली. त्याच्या कारला आग लागली. पण त्यात तोसुद्धा भाजला पण त्याचा जीव वाचला. १९९५ साली पुन्हा एक बस अपघात झाला. जाग्रेब बसने त्याला पाडलं होतं.

त्याच्या पुढच्या वर्षीच फ्रेनचा शेवटचा अपघात झाला. डोंगर असलेल्या रस्त्यावर एका ट्रकने त्याच्या कारला धडक दिली आणि त्याच्या कारचा विस्फोट झाला. पण तो वेळीच कारमधून बाहेर आला आणि या भयंकर दुर्घटनेतूनही तो बचावला.

इतक्या वेळा अपघातातून कोण कसं काय वाचू शकतं? हे जगातलं आठव आश्चर्यच आहे. त्यामुळेच फ्रेनला नशीबवान समजलं जातं आहे.

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेCroatiaक्रोएशियाcarकारairplaneविमानriverनदीrailwayरेल्वे