महिला बाहेर जाताच तिच्या घरात शिरत होता घरमालक, बेडरूममध्ये जाऊन करत होता हे विचित्र काम....
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 16:21 IST2021-07-22T16:15:37+5:302021-07-22T16:21:15+5:30
जर तुम्ही भाडेकरू आहात आणि तुम्हाला कुणाकडून समजलं की, तुम्हाला न सांगता तुमचा घरमालक घरात शिरतो किंवा बेडरूममध्ये जातो.

महिला बाहेर जाताच तिच्या घरात शिरत होता घरमालक, बेडरूममध्ये जाऊन करत होता हे विचित्र काम....
प्रत्येक व्यक्ती आपल्या घरातून बाहेर जातो तेव्हा दाराला लावतो आणि सिक्युरिटी चेक करायला विसरत नाही. पण जर तुम्ही घरात नसताना एखादी व्यक्ती घरात घुसली तर कुणालाही वाटेल की, ती व्यक्ती चोरी करण्याच्या उद्देशाने घरात शिरली असेल. मात्र, एका महिलेसोबत याहून वेगळी हैराण करणारी एक घटना घडली आहे. या महिलेचा घरमालक महिला घराबाहेर गेल्यावर तिच्या घरात शिरत होता आणि तिच्या बेडवर झोपत होता. त्यासोबतच तो असं काही करत होता ज्यामुळे महिला वैतागली.
जर तुम्ही भाडेकरू आहात आणि तुम्हाला कुणाकडून समजलं की, तुम्हाला न सांगता तुमचा घरमालक घरात शिरतो किंवा बेडरूममध्ये जातो. तर अर्थातच हे समजल्यावर तुम्हाला राग येणारच. एक महिला शिक्षिका Tyisha Macleod ला एक घरमालकाचा एक विचित्र अनुभव आला. तिच्या बेडरूममध्ये घुसून विचित्र गोष्टी करणाऱ्या घरमालकाला तिने रंगेहाथ पकडलं आहे. (हे पण वाचा : सोना ही सोना! पोलीस अधिकाऱ्याच्या घरात सोन्याचं टॉयलेट अन् झुंबर, समोर आले आलिशान घराचे फोटो....)
Tyisha तिच्या घरातील सिक्युरिटी सिस्टीमवर तिच्या घरमालकाला विचित्र गोष्टी करताना कॅमेरात कैद केलं. क्लिपमध्ये बघायला मिळतं की, तिचा घरमालक तिच्या बेडरूममध्ये शिरतो आणि तिच्या बेडवर झोपतो. घरमालक तिच्या घरात वस्तूंची चोरी करण्यासाठी शिरत नाही. तर तो तिच्या बेडवर झोपतो आणि तिने वापरलेल्या उशीचा वास घेतो, तिच्या बेडशिटचा वास घेतो. त्यानंतर लगेच रूममधून बाहेर निघून जातो. (हे पण वाचा : एक वर्षापासून प्रेग्नेंट होऊ शकत नव्हती महिला, पतीची चलाखी समजल्यावर घेतला घटस्फोट)
Tyisha Macleod ने टिकटॉकवर आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात घरमालक घराच्या आत आपल्या एका मित्रासोबत बोलत आहे. तो सांगताना दिसत आहे की, तो Tyisha च्या मांजरीला जेवण द्यायला तिच्या रूममध्ये गेला होता. तर Tyisha ने सांगितलं की, तिने त्याला घरात शिरण्याची परवानगीच दिली नाही. Tyisha ने व्हिडीओ पाहिल्यावर याबाबत घरमालकाला विचारलं तर तो म्हणाला की, तो मांजरीला बघण्याासाठी आत गेला होता. Tyisha ने याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे.