कमालच! गायीच्या ढेकरीपासून बनवले जात आहे हिरे, कारण वाचून कराल कौतुक....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 02:39 PM2024-05-21T14:39:46+5:302024-05-21T14:41:40+5:30

ही व्यक्ती वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी फेमस आहे. ही व्यक्ती आता गायीची ढेकर आणि गॅसमधून निघणाऱ्या मीथेनला हिऱ्यात बदलत आहे.

ipod inventor Tony Fadell making diamonds from cow burps and farts | कमालच! गायीच्या ढेकरीपासून बनवले जात आहे हिरे, कारण वाचून कराल कौतुक....

कमालच! गायीच्या ढेकरीपासून बनवले जात आहे हिरे, कारण वाचून कराल कौतुक....

गायीचं दूध किंवा गोमुत्र आरोग्यासाठी किती महत्वाचं मानलं जातं. हे सगळ्यांनाच माहीत. पण जर आम्ही तुम्हाला सांगितलं की, गायीच्या ढेकरीपासून किंवा गॅसपासून हिरे बनवले जाऊ शकतात तर? अर्थात यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण असं केलं जात आहे iPod चा अविष्कार करणारे टोनी फॅडेल असं करत आहे. ही व्यक्ती वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी फेमस आहे. ही व्यक्ती आता गायीची ढेकर आणि गॅसमधून निघणाऱ्या मीथेनला हिऱ्यात बदलत आहे. या हिऱ्यांचा आज इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंमध्ये वापरही होत आहे.

मेट्रोच्या रिपोर्टनुसार, टोनी फॅडेलने ब्रातिस्लावामध्ये स्टार्मस फेस्टिवल दरम्यान आपल्या नवीन प्रयोगाची माहिती दिली. जी ऐकून लोक हैराण झाले. ते म्हणाले की, बऱ्याच वर्षापासून त्यांनी कोट्यावधी प्रोडक्‍ट बनवले ज्यांचा लोक वापर करत आहेत. पण आता मी माझा जास्तीत जास्त वेळ पृथ्वीची मदत करण्यासाठी देत आहे. मीथेन जास्त कुठे आहे हे जाणून घेण्यासाठी याचवर्षी मीथेनसॅट नावाचा एक उपग्रह लॉन्‍च करण्यात आला होता. त्यासाठी मी पैसे दिले. त्याचं डिझाइन आणि निर्माण आमच्या टीमने केलं. आम्हाला पृथ्वीला वाचवायचं आहे आणि त्यासाठी प्रयत्न करू.

मीथेनपासून हिरे

फॅडेलने सांगितलं की, सध्या आम्ही गायीची ढेकर आणि गॅसमधून निघणाऱ्या मीथेनपासून हिरे बनवत आहोत. यात भरपूर मीथेन असतं. जे आम्ही गोळा करतो. माझी डायमंड फाउंड्री नावाची कंपनी आहे. आम्ही एकतर गायीपासून किंवा जमिनीतून बायोमीथेन घेतो. ते आम्ही हरित ऊर्जा, पवन आणि सौर ऊर्जा हिऱ्यात रूपांतर करतो. CO2 प्रमाणे मीथेनमध्येही कार्बनचे अणु असतात. जे कंपनी हिरे बनवण्यासाठी काढतात. आता या हिऱ्यांचा वापर मुख्यत्वे इलेक्ट्रॉनिक्समध्ये केला जातो.

फॅडेल स्रोतावर मीथेन रोखण्याचा प्रयत्न करतात. जेणेकरून वातावरणात पसरू नये. कारण यामुळे पृथ्वीचं तापमान वाढतं. ते म्हणाले की, माझी सीएच4 ग्लोबल नावाची आणखी एक कंपनी आहे आणि आम्ही लाल समुद्री शेवाळ बनवतो. जर तुम्ही लाल शेवाळ चाऱ्यासोबत आपल्या प्राण्यांना द्याल तर त्यांना ढेकर येणं 80 ते 90 कमी होऊ शकतं. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमानुसार मीथेन निघाल्यावर 80 टक्के जास्त नुकसान होतं. ते 20 वर्षापर्यंत वायुमंडळात राहतं.

Web Title: ipod inventor Tony Fadell making diamonds from cow burps and farts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.