'तिच्या'साठी काय पण! 2 मुलांच्या आईचं दिरावर प्रेम जडलं, पतीनेच दोघांचं लग्न लावून दिलं; नातेवाईक झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 03:57 PM2021-07-29T15:57:24+5:302021-07-29T16:04:25+5:30

Marriage News : आपल्या पत्नी आणि भावाच्या नात्याबद्दल समजलं तेव्हा त्याने भांडण न करता आपल्या मर्जीने भावाचं लग्न पत्नीसोबत लावलं.

dhanbad in peculiar move husband got her wife tied in nuptial knot with his cousin 2 brother | 'तिच्या'साठी काय पण! 2 मुलांच्या आईचं दिरावर प्रेम जडलं, पतीनेच दोघांचं लग्न लावून दिलं; नातेवाईक झाले हैराण

'तिच्या'साठी काय पण! 2 मुलांच्या आईचं दिरावर प्रेम जडलं, पतीनेच दोघांचं लग्न लावून दिलं; नातेवाईक झाले हैराण

Next

नवी दिल्ली - प्रेमासाठी अनेक जण वाटेल ते करतात. त्यांच्या प्रेमाचे भन्नाट किस्से हे नेहमीच ऐकायला मिळतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एका लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. 2 मुलांच्या आईंचं आपल्या दिरावर प्रेम जडलं. त्यानंतर पतीनेच दोघांचं लग्न लावून दिल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे नातेवाईकांसह सर्वच जण हैराण झाले आहेत. झारखंडच्या गिरिडीह येथील लचकन गावात ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नानंतर या व्यक्तीच्या पत्नीचं आपल्या दिरावर प्रेम जडलं. त्यामुळे महिलेच्या पतीने त्याचंच लग्न लावण्याचा निर्णय घेतला.

जेव्हा या व्यक्तीला आपल्या पत्नी आणि भावाच्या नात्याबद्दल समजलं तेव्हा त्याने भांडण न करता आपल्या मर्जीने भावाचं लग्न पत्नीसोबत लावलं. तसेच दोघं सुखी राहावीत म्हणून आशीर्वाद देखील दिला. ही महिला दोन मुलांची आई आहे. कोणालाही काहीही न सांगता एकदा महिला अचानक गुजरातच्या सुरतमध्ये पोहोचली. इथे तिचा पती आणि दीर काम करत असे. मात्र सूरतमध्ये गेल्यानंतर पतीकडे जाण्याऐवजी ती दिराच्या घरी गेली. दोघंही सोबत राहू लागले होते आणि यादरम्यान दोघांनी आपले फोटोही सोशल मीडियावर अपलोड केले होते. ते फोटो खूप व्हायरल झाले होते. 

महिलेच्या पतीला याबाबत माहिती झालं तेव्हा तो आपल्या भावाच्या घरी पोहोचला आणि तिथे जाऊन त्याने दोघांशी चर्चा केली. महिलेने दिरावर आपलं प्रेम असल्याची माहिती पतीला दिली. त्यानंतर पतीने स्वतः आपल्या भावाचं आणि पत्नीचं लग्न करून दिलं आणि दोघांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. महिलेच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर मला माहिती झालं की माझी पत्नी गावातील माझ्या भावाला पसंत करते. जेव्हा मला याबाबत माहिती झालं तेव्हा मी त्यांच्या मध्ये न येण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचं लग्न लावलं. सध्या या लग्नाची जोरदार चर्चा होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सैराटची पुनरावृत्ती! वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावून अपहरण करत वडिलांनीच केली लेकीची हत्या

हरियाणामध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. सैराटची पुनरावृत्ती झाली आहे. प्रेम विवाहामुळे नाराज झालेल्या एका वडिलांनी संतापाच्या भरात आपल्या मुलीची निर्घृण हत्या केली आहे. वाढदिवसाच्या बहाण्याने तिला घरी बोलावून अपहरण करत वडिलांनी मुलीची हत्या केल्याची भयंकर घटना उघड झाली आहे. सोनीपतमधील या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. आरोपी वडिलांनी मुलीच्या हत्येनंतर तिचा मृतदेह मेरठजवळील एका कालव्यात फेकून दिला आहे. अखेर आरोपीला अटक करण्यात पोलिसांनी यश आलं आहे.  राई पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील मुकीमपूर येथील ही धक्कादायक घटना आहे. तरुणीचा मृत्यूपूर्वीचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे, ज्यात ती म्हणत आहे की तिचा मृत्यू झाल्यास याला जबाबदार तिचे वडील, भाऊ आणि मित्र असतील. पोलिसांनी याप्रकरणी मुलीच्या वडिलांना अटक केली आहे.

Web Title: dhanbad in peculiar move husband got her wife tied in nuptial knot with his cousin 2 brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app