सैराटची पुनरावृत्ती! वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावून अपहरण करत वडिलांनीच केली लेकीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 10:45 AM2021-07-29T10:45:21+5:302021-07-29T10:52:36+5:30

Crime News : प्रेम विवाहामुळे नाराज झालेल्या एका वडिलांनी संतापाच्या भरात आपल्या मुलीची निर्घृण हत्या केली आहे.

murder father killed daughter love marriage police arrested sonipat haryana | सैराटची पुनरावृत्ती! वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावून अपहरण करत वडिलांनीच केली लेकीची हत्या

सैराटची पुनरावृत्ती! वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावून अपहरण करत वडिलांनीच केली लेकीची हत्या

Next

नवी दिल्ली - हरियाणामध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. सैराटची पुनरावृत्ती झाली आहे. प्रेम विवाहामुळे नाराज झालेल्या एका वडिलांनी संतापाच्या भरात आपल्या मुलीची निर्घृण हत्या केली आहे. वाढदिवसाच्या बहाण्याने तिला घरी बोलावून अपहरण करत वडिलांनी मुलीची हत्या केल्याची भयंकर घटना उघड झाली आहे. सोनीपतमधील या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. आरोपी वडिलांनी मुलीच्या हत्येनंतर तिचा मृतदेह मेरठजवळील एका कालव्यात फेकून दिला आहे. अखेर आरोपीला अटक करण्यात पोलिसांनी यश आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राई पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील मुकीमपूर येथील ही धक्कादायक घटना आहे. तरुणीचा मृत्यूपूर्वीचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे, ज्यात ती म्हणत आहे की तिचा मृत्यू झाल्यास याला जबाबदार तिचे वडील, भाऊ आणि मित्र असतील. पोलिसांनी याप्रकरणी मुलीच्या वडिलांना अटक केली आहे. यानंतर आरोपीनं दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी तरुणीचा मृतदेह कालव्यात शोधण्यास सुरुवात केली आहे. तरुणीच्या पतीने वडील विजयपाल यांच्यासह इतरही चार नातेवाईकांवर अपहरणाचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. 

वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने आम्हाला दोघांना बोलावण्यात आलं होतं. तो काही अंतरावरच थांबला होता. यानंतर ठाण्याच्या समोरच त्याच्या पत्नीचं अपहरण केलं गेलं अशी माहिती तरुणीच्या पतीने पोलिसांना दिली आहे. मुकीमपूर येथील रहिवासी असलेल्या तरुणीने 2020 मध्ये शेजारीच राहणाऱ्या एका तरुणासोबत प्रेमविवाह केला होता. दोघांनीही आपल्या कुटुंबीयांच्या विरोधात जात घरातून पळून जाऊन लग्न केलं होतं. दोघांचं घर गावात शेजारीच होतं. या लग्नामुळे मुलीचे कुटुंबीय नाराज होते. लग्नानंतर हे दोघंही कुठेतरी लपून राहात होते.

लग्नामुळे नाराज असलेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी तरुणीला आणि तिच्या पतीला खोटं सांगितलं की आता या लग्नाला त्यांचा विरोध नाही. तसेच जुन्या गोष्टी विसरून दोघांनाही परत येण्यास सांगण्यात आलं. यानंतर दोघंही कुटुंबीयांसोबत फोनवर बोलू लागले. मुलीचे वडील विजयपाल यांनी सहा जुलै रोजी आपल्या मुलीला फोन केला आणि म्हणाले की सात जुलैला त्यांचा वाढदिवस आहे. तुम्ही दोघंही वाढदिवस साजरा करण्यासाठी घरी या. सर्व मिळून मिठाई खायची आणि जुन्या गोष्टी विसरून नव्याने सुरुवात करायची. मुलांकडून चुका होत असतात.

दोघंही विजयपालच्या जाळ्यात अडकले आणि आपल्या वडिलांना फोन करत आपण राई ठाण्याच्या समोर उभं असल्याचं तरुणीने सांगितलं. विजयपाल काही आरोपींसोबत कारमध्ये आला आणि आपली मुलगी कनिका हिला सहा जुलै रोजी कारमध्ये घेऊन गेला. तरुणीचा पती वेदप्रकाश दूर उभा राहून हे सर्व पाहत होता. दोन दिवसांनंतर मुलीच्या पतीने आपल्या सासऱ्यांना फोन केला आणि पत्नीसोबत बोलायचं असल्याचं सांगितलं. यावर त्याला असं उत्तर मिळालं, की सध्या ती झोपली आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा फोन केला असता असं सांगण्यात आलं की ती आपल्या आत्याच्या घरी गेली आहे. दोन दिवसांनंतर पुन्हा फोन केला असता ती आपल्या मावशीच्या घरी गेल्याचं सांगण्यात आलं. 

वेदप्रकाशला संशय आला आणि त्यानं पोलिसांना याबाबत माहिती दिली. 20 जुलै रोजी वेदप्रकाश पुन्हा पोलीस ठाण्यात गेला आणि आपल्या पत्नीच्या हत्येची आणि अपहरणाची शंका त्यानं बोलून दाखवली. यानंतर पोलिसांनी पुन्हा तपास सुरू केला. तक्रारीनंतर पोलिसांनी कसून चौकशी करताच मुलीच्या वडिलांनी सांगितलं की सहा जुलै रोजीच ठाण्याच्या समोरून घेऊन जात मुलीची हत्या केली आणि तिचा मृतदेह मेरठजवळील एका कालव्यात फेकून दिला. तो तिला गावी घेऊन गेला नाही. सोबतच आपल्याला या गोष्टीचा काहीही पश्चाताप नसल्याचंही त्याने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: murder father killed daughter love marriage police arrested sonipat haryana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app