Video: घरातून येऊ लागला भयानक आवाज; अचानक फरशी फोडून निघाल्या 3 अजस्त्र मगरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 03:20 PM2023-08-13T15:20:08+5:302023-08-13T15:21:33+5:30

घराच्या फरशीखालून अचानक बाहेर आल्या मगरी; घटना भारतातील असल्याचा दावा. पाहा Video...

Crocodile under floor Video: Terrible noise coming from house; Suddenly 3 huge crocodiles came from floor | Video: घरातून येऊ लागला भयानक आवाज; अचानक फरशी फोडून निघाल्या 3 अजस्त्र मगरी

Video: घरातून येऊ लागला भयानक आवाज; अचानक फरशी फोडून निघाल्या 3 अजस्त्र मगरी

googlenewsNext

Crocodile under floor: मगर असा प्राणी आहे, जो आपल्या जबड्यात आलेल्या भक्षाचा फडशा पाडल्याशिवाय सोडत नाही. म्हणूनच 'पाण्यात राहुन मगरीशी वैर करायचे नाही', असे म्हटले जाते. मगर सहसा तलाव, नदी किंवा काही ठिकाणी समुद्रात आढळते. ही स्तनधारी असल्यामुळे कधी-कधी जमिनीवरही येते. पण, अचानक तुमच्या घरात मगर आली तर? विचार करुनच थरकाप उडेल. 

दरम्यान, अशी एक घटना समोर आली आहे, जी पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात काही लोक मगरींना पकडत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, या मगरी थेट जमीन फोडून बाहेर आल्या आहेत. ऐकून आश्चराय वाटेल, पण असे घडले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हा व्हिडिओ भारतातील आहे.

एका व्यक्तीच्या घरात अचानक भीतीदायक आवाज येऊ लागला. त्यांनी सर्व घर शोधले, पण त्यांना काही दिसले नाही. अखेर त्यांना समजले की, हा आवाज जमिनीच्या खालून येत आहे. एका ठिकाणी जमिनीचे प्लास्टर निघाले होते, तेथून त्यांनी डोकावून पाहिल्यावर त्यांना जबर धक्का बसला. त्यांना या प्लॅस्टरच्या खाली अजस्त्र मगर आढळून आली.

यानंतर घाबरुन त्यांनी प्लास्टर तोडले असता चक्क 3 मगरी जमीन फोडून बाहेर येऊ लागल्या. या मगरींना एका मोठ्या कडचीच्या साहाय्याने पकडण्यात आले. इन्स्टाग्रामवर @mksinfo.official अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला लाखो व्हू मिळाले असून, लोक त्यावर भरभरून कमेंट्सही करत आहेत. दरम्यान, या मगरी तिथे कशा गेल्या आणि गेल्या, हे अद्याप समजू शकले नाही.

Web Title: Crocodile under floor Video: Terrible noise coming from house; Suddenly 3 huge crocodiles came from floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.