शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : आनंद महिंद्रांकडून Work From Homeचा मजेशीर किस्सा शेअर; म्हणाले, मीसुद्धा लुंगीवर घेतो मीटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 15:49 IST

आनंद महिंद्रांनी एक फोटो ट्विट करत एका बाजूला अपेक्षा आणि दुसऱ्या बाजूला खरी परिस्थिती दर्शवली आहे.

नवी दिल्लीः कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची मुभा दिली आहे. लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियावर वर्क फ्रॉम होमचे मीम्सही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. लॉकडाऊनच्या काळात कर्मचारी कशा पद्धतीनं वर्क फ्रॉम होमचा आनंद लुटतायत हे पाहण्याजोगं आहे. महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनीसुद्धा ट्विटरवर वर्क फ्रॉम होमशी संबंधित मीम्स शेअर केला आहे. आनंद महिंद्रांनी एक फोटो ट्विट करत एका बाजूला अपेक्षा आणि दुसऱ्या बाजूला खरी परिस्थिती दर्शवली आहे. माझ्या #whatsappwonderboxच्या माध्यमातून फोटो शेअर करत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. या फोटोमध्ये जिथे 'एक्सपेक्टेशन' लिहिलं आहे, त्या बाजूला एक व्यक्ती कोट आणि पँट परिधान करून आरामात घरात बसून काम करताना दिसतोय, तर रिएलिटीमध्ये वर्क फ्रॉम होमदरम्यान एक व्यक्ती लुंगी घालून स्वयंपाकघरात जेवण बनवताना पाहायला मिळतो आहे. या फोटोवर आनंद महिंद्रा लिहितात, मीसुद्धा ऑफिसचं काम घरून करत असताना शर्ट आणि लुंगी घालून व्हिडीओ कॉन्फरन्सिंग घेत असतो. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगदरम्यान मी नेहमीच ध्यानात ठेवतो की मला उभं राहायचं नाही. २१ दिवस लॉकडाऊन असूनही भारतात कोरोना व्हायरसचा कहर थांबायचं नाव घेत नाहीये. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, रुग्णांची संख्या चार हजारांच्या वर गेली आहे. आतापर्यंत भारतात कोरोना व्हायरसमुळे १०९ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि ४०६७ लोक या संसर्गाचे बळी ठरले आहेत. बरे होणा-या रुग्णांची संख्या २३२ आहे. गेल्या २४ तासांच्या कालावधीत ३२ लोकांचा मृत्यू झाला असून, ६९३ नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या