डबल धमाका! ग्राम पंचायत निवडणूक जिंकली अन् लग्न थांबवून मधेच विजयाचं सर्टिफिकेट घेण्यासाठी गेली नवरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 10:32 AM2021-05-03T10:32:09+5:302021-05-03T10:37:22+5:30

नवरीने लग्नाचे रितीरिवाज तसेच अर्धवट ठेवले आणि ती मतमोजणी सुरू असलेल्या ठिकाणी आपलं विजयाचं प्रमाणपत्र घेण्यासाठी पोहोचली.

bride win UP gram panchayat election as a bdc, reached counting place victory certificate | डबल धमाका! ग्राम पंचायत निवडणूक जिंकली अन् लग्न थांबवून मधेच विजयाचं सर्टिफिकेट घेण्यासाठी गेली नवरी!

डबल धमाका! ग्राम पंचायत निवडणूक जिंकली अन् लग्न थांबवून मधेच विजयाचं सर्टिफिकेट घेण्यासाठी गेली नवरी!

googlenewsNext

(Image Credit : Aajtak)

लग्न मंडपात लग्नाचे रितीरिवाज पार पाडत असलेल्या नवरीला जेव्हा समजलं की, ती ग्राम पंचायत निवडणूक जिंकली आहे. तर ती आनंदाने भारावून गेली होती. अशात नवरीने लग्नाचे रितीरिवाज तसेच अर्धवट ठेवले आणि ती मतमोजणी सुरू असलेल्या ठिकाणी आपलं विजयाचं प्रमाणपत्र घेण्यासाठी पोहोचली.

ही घटना आहे उत्तर प्रदेशच्या रामपूरमधील मिलक तहसीलमध्ये येणाऱ्या मोहम्मदपूर जदीदची. इथे नवरदेव यूपीच्या बरेलीमधून वरात घेऊन आला होता. लग्नाचा मंडप सजलेला होता आणि नवरी पूनम तिच्या लग्नाचे रितीरिजाव पार पाडत होती. यादरम्यान तिला समजलं की, ती ग्राम पंचायत निवडणूक जिंकली आहे. ती आनंदी झाली आणि लग्न थांबवून ती थेट मजमोजणी सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचली. (हे पण वाचा : क्या बात! काठ्यांच्या मदतीने नवरी-नवरदेवाने एकमेकांच्या गळ्यात घातले हार, सोशल मीडियातून प्रशंसा...)

मतमोजणी केंद्रावर लाल लेहंग्यात, दागिने घालून सजलेली नवरी पाहून सगळेच  हैराण झाले. मात्र, जेव्हा तेथील लोकांनी समजले की, नवरी निवडणुकीत उभी होती आणि आता विजयी झाली तर सगळेजण तिला नशीबवान म्हणत राहिले.

पूनमला एकूण ६०१ मते मिळाली. तिने विरोधी उमेदवार शकुंतला यांना ३१ मतांनी पराभूत केलं. या विजयासोबतच पूनम यांचा आनंद द्विगुणीत झाला. असे सांगितले जात आहे की, काही रितीरिवाज सुरू होते तर काही बाकी होते. अशात विजयाची बातमी मिळताच नवरी थेट मतमोजणीच्या ठिकाणी पोहोचली.

विजयानंतर पूनम म्हणाली की, एकीकडे लग्नाचा आनंद आणि दुसरीकडे निवडणूक जिंकल्याचा आनंद. मी हा क्षण कधीच विसरू शकणार नाही. यापेक्षा मोठी गोष्ट आणखी काय अस शकते. पूनमने सांगितले की, लग्नाचे रिजीरिवाज जवळपास पूर्ण झाले आहेत. मी विजयाचं प्रमाणपत्र घ्यायला आली आहे. गावात लग्न सुरू आहे.
 

Web Title: bride win UP gram panchayat election as a bdc, reached counting place victory certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.