क्या बात! काठ्यांच्या मदतीने नवरी-नवरदेवाने एकमेकांच्या गळ्यात घातले हार, सोशल मीडियातून प्रशंसा...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 09:36 AM2021-05-03T09:36:47+5:302021-05-03T09:47:21+5:30

नवरदेवाने सांगितले की, हे लग्न त्याच्यासाठी यादगार राहणार. खासकरून काठ्यांनी एकमेकांच्या गळ्यात हार घालणं.

Bride and groom using stick for rituals corona guideline Begusarai Bihar | क्या बात! काठ्यांच्या मदतीने नवरी-नवरदेवाने एकमेकांच्या गळ्यात घातले हार, सोशल मीडियातून प्रशंसा...

क्या बात! काठ्यांच्या मदतीने नवरी-नवरदेवाने एकमेकांच्या गळ्यात घातले हार, सोशल मीडियातून प्रशंसा...

Next

(Image Credit : Aajtak)

कोरोनामुळे लग्नाचे सर्व नियम बदललेले बघायला मिळतात. असंच एक वेगळं लग्नबिहारच्या बेगूसरायमध्ये बघायला मिळालं. सध्या या लग्नाची सगळीकडे चर्चा रंगली आहे. या लग्नात नवरी-नवरदेवाने सोशल डिस्टंसिंग पाळत काठ्यांच्या मदतीने एकमेकांच्या गळ्यात हार घातले आहे. ही पद्धत अनेकांना आवडली आहे.

कोरोना काळात सोशल डिस्टंसिंग आणि मास्क लावण्याची गाइडलाईन जारी केली आहे. अशात अशाप्रकारे काही लोक लग्नात नियमांचं पालन करून इतरांना जागरूकही करत आहे. नवरदेवाने सांगितले की, हे लग्न त्याच्यासाठी यादगार राहणार. खासकरून काठ्यांनी एकमेकांच्या गळ्यात हार घालणं.

या लग्नात नियमानुसार परिवारातील केवळ ५० लोकच उपस्थित होते आणि पूर्ण नियमानुसार सरकारी गाइडलाईन पालन करत हे लग्न पार पडलं. लग्नात सामिल झालेले आणि सोशल मीडियावरील लोक या कपलची प्रशंसा करत आहेत. हे अनोखं लग्न तेघडा अमुमंडल परिसरातील तेघरा बाजारात पार पडलं. 

गिरधारीलाल सुल्तानिया यांचे पूत्र कृतेश कुमारचं लग्न बेगूसरायच्या ज्योती कुमारीसोबत ३० एप्रिलला रात्री पार पडलं होतं. काठ्यांच्या मदतीने दोघांनी एकमेकांना हार घातल्याने हे लग्न सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, कोरोना काळात सर्वच लग्नांमध्ये चित्र बदलेललं दिसतं. पाहुण्यांना फुलांऐवजी मास्क आणि सॅनिटायजर दिलं जातंय. त्यासोबतच लग्नात वेगवेगळ्या आयडिया लावल्या जात आहेत. कुठे कुठे तर व्हिडीओ कॉलवरून लग्ने लागली आहेत.
 

Web Title: Bride and groom using stick for rituals corona guideline Begusarai Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.