जगभरातील प्रत्येक महिलेला त्यांच्या मनासारखा नवरा मिळावा असं वाटत असतं. पण हे काही सोपं काम नाही. काही महिलांचा मनासारखा नवरा मिळवण्याचा शोध थांबतो तर काहींचा थांबत नाही. ऑस्ट्रेलियात एक अशीच अजब घटना समोर आली आहे. यावर विश्वास ठेवणे जरा कठीण होऊ शकतं. झालं असं आहे की, ऑस्ट्रेलियातील एक महिला आदर्श पतीच्या शोधात होती.
आता या महिलेचा नवऱ्यासाठीचा शोध थांबला आहे. या महिलेला एक शक्तिशाली, स्थिर आणि शांत पुरूषाचा लग्नासाठी शोध सुरू होता. तिचा हा शोध फ्रान्समध्ये जाऊन संपला आहे. सिडनीमध्ये राहणारी जोडी रोजने २०१३ मध्ये दक्षिण फ्रान्सच्या सेरेतमध्ये टेक नदीवर असलेल्या 'ले पोंट डु डायबल'(द डेविल्स ब्रीज) सोबत लग्न करून सर्वांनाच हैराण केलंय. ज्यावेळी रोज फ्रान्सची सैर करत होती, त्यावेळी तिला १४व्या शतकातील पूलावर जाण्याची संधी मिळाली. दरम्यान या पुलावर तिचं मन आलं.
रोजला तिच्या नवऱ्यामध्ये ज्या गोष्टी हव्या होत्या, त्या तिला या पुलामध्ये दिसल्या आणि तिने पुलाशी लग्न केले. रोजच्या या आगळ्या-वेगळ्या लग्नात १४ लोक सहभागी झाले होते. इतकेच नाही तर यादरम्यान शेजारील शहर सेंट-जीन-डे-फॉसच्या मेअरनी नवरी-नवरदेवाला(पूल) आशीर्वाद दिला होता.
डेली मेलसोबत बोलताना रोज सांगते की, 'पुलासोबत लग्न करणे तिच्यासाठी एक वेगळा आणि शानदार अनुभव होता'. तिला लग्नाच्या दिवशी नर्व्हसही वाटत होतं आणि उत्साहितही वाटत होतं. कारण नवरदेव स्थिर आणि शांत होता. रोज लग्नाच्या ६ वर्षांनंतरही लग्नाची अंगठी अजूनही घालते.
'रोज' ने तिच्या ब्लॉगमध्ये तिच्या नवरदेवाबाबत लिहिले की, 'तो मला पृथ्वीशी कनेक्टेड असल्याची जाणीव करून देतो आणि मला भरकटण्यापासून रोखतो. तो स्थिर आणि जमिनीशी जुळलेला आहे. तो मला स्वर्गाचा आनंद देतो. तो मला त्याच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करतो. मी त्याच्याप्रति पूर्णपणे समर्पित आहे. भलेही फ्रान्समध्ये या लग्नाला कायदेशीर मान्यता नाही, पण आमचं नातं फार मजबूत आहे.