उत्तर प्रदेशातील 'या' किल्ल्यात दडलाय ४,००० किलो सोन्याचा खजिना; जाणून घ्या इतिहास...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 18:42 IST2025-09-29T18:41:52+5:302025-09-29T18:42:36+5:30
Sonbhadra Agori Fort: सोन्याच्या शोधात स्थानिकांनी किल्ल्याचे मोठे नुकसान केले आहे.

उत्तर प्रदेशातील 'या' किल्ल्यात दडलाय ४,००० किलो सोन्याचा खजिना; जाणून घ्या इतिहास...
Sonbhadra Agori Fort:उत्तर प्रदेशच्या सोनभद्र जिल्ह्यातील अगोरी किल्ल्यात अनेक गोष्टी दडलेल्या आहेत. विशेषतः यातील 4000 किलो सोन्याच्या खजिन्यामुळे किल्ल्याची अनेकदा चर्चा होते. अनेक शतकांपासून हा खजिना शोधण्याचे अनेकांनी प्रयत्न केले, पण कुणालाच काही सापडले नाही.
अगोरी किल्ल्याचा इतिहास
12व्या शतकात चंदेल राजपूतांनी खैरवार राजपुत्रांना हरवून किल्ल्याची उभारणी केली. राजा भ्रम जित आणि त्यांचे पुत्र परीमल यांनी हा किल्ला उभारला. त्याकाळी हा किल्ला 400 गावांचे प्रमुख केंद्र होते. इथे मुघल काळापर्यंत लाखो रुपये कर प्राप्ती होत असे. रिहंद, सोन आणि बिजुल नद्यांनी वेढलेला किल्ला रणनीतीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा होता.
साधारणपणे 711 ईसवीमध्ये आदिवासी राजा बाल शाह यांनी चंदेल राजपुत्रांपासून बचाव करण्यासाठी 4000 किलो सोने पनारी जंगलमध्ये लपवले होते. हे किल्ल्यापासून फक्त 7 किलोमीटर दूर आहे. काही लोककथा सांगतात की, बाल शाह जंगली यांची जंगली प्राण्यानी शिकार केली, तर त्यांची पत्नी जुराहीला चंदेल राजाने जुगैल गावमध्ये मारले.
खैरवार समाजाच्या लोकांना एका गुफेमध्ये राजाच्या तलवारी आणि कवच सापडले, पण सोने अजूनही सापडले नाही. या किल्ल्यातील खजिना शोधण्याचे शेकडो वर्षांपासून अनेक प्रयत्न झाले, पण आजही खजिन्याचे रहस्य उलगडले नाही. आज या किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे, त्याचा आध्यात्मिक ठिकाण म्हणून उपयोग. येथे माँ दुर्गाची प्राचीन मूर्ती भक्तांच्या आस्थेचे केंद्र आहे.
किल्ल्यात सापडली विशाल शिळा अन् फारसी शिलालेख
किल्ल्याच्या रोमांचक इतिहासाने 1616 साली एक नवे वळण घेततले. या किल्ल्यात फारसी शिलालेख आढळला, ज्यावर त्या किल्ल्याचा इतिहास कोरलेला होता. सध्या उत्तर प्रदेश पर्यटन विभाग अगोरी किल्ल्याला एक जागतिक पर्यटन स्थळ बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे.