शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

वाघूर नदीच्या पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 21:25 IST

पाण्याच्या प्रवाहात वाढ : रुग्णालयाच्या सुविधांविषयी संतप्त भावना

पहूर, ता.जामनेर : सकाळी शौचास गेलेल्या कसबेतील युवकाचा वाघूर नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली.गेल्या दोन दिवसापासून वाघूर नदीला पूर असल्याने पाण्याचा प्रवाह वाढला आहे. या युवकाचा पाय घसरल्याने नदीच्या पात्रात पडला. शेख शाहरुख शेख आयुब (२७) हा युवक शौचास गेला असता नदीपात्रात पाय घसरून त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी सात ते साडेसात वाजेच्या सुमारास घडली. घरचा एकुलता एक कर्ता विवाहित युवक असल्याने त्याचा संसार उघड्यावर आला आहे. या घटनेने ग्रामीण रुग्णालयातील सुविधांविषयी संतप्त भावना नातेवाईकांनी व्यक्त केल्या आहेत.शेख शाहरुख याचा पाय घसरल्याने खोल भागात साचलेल्या गाळात तो अडकला. नदीतील पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे. जवळपास पंधरा मिनिटे हा युवक पाण्यात होता. ही घटना चेतन जाधव व संजय यांच्या निदर्शनास येताच चेतनने पाण्यात उडी घेऊन संजयच्या सहकार्याने त्याला पाण्याच्या बाहेर काढले. प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप कुमावत यांनी त्याला मृत घोषित केले. या दरम्यान मोठा जमाव उपस्थित होता.शवविच्छेदनगृहात युवक जिवंत असल्याच्या चर्चेने तणावयुवकास मयत घोषित केल्यानंतर शवविच्छेदन रूममध्ये मृतदेह ठेवण्यात आला. यादरम्यान एका युवकाच्या हातचा दाब मयताच्या पोटावर पडल्याने तोंडावाटे पाणी बाहेर येऊन श्वास निघाल्याचे उपस्थित युवकांनी पाहिले. त्यामुळे युवक जिंवत असल्याच्या चर्चेने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्याला रुग्णवाहिकेने जळगावला नेत असताना डॉक्टरांनी पुन्हा तपासून मृत असल्याचे सांगितले.रग्णसेवेविषयी संतापरूग्णालयात येणाऱ्या रूग्णांना सेवा मिळत नाही. घटनेनंतर शाहरूख बराच वेळ जिंवत होता. पण डॉक्टरांनी विशेष उपचार केले नाही. त्याला जिवंत असूनही मृत घोषित केले व शवविच्छेदन रूममध्ये ठेवले, असा संताप शाहरूखच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. मात्र शाहरुख मृत झाला होता. त्यांनतरच शवविच्छेदन रूममध्ये मृतदेह पाठविला, असे रुग्णालयाकडून सांगितले आहे.