तरुण व नातेवाईकांना टोळक्याची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 12:47 IST2020-03-15T12:46:55+5:302020-03-15T12:47:26+5:30

रेल्वेस्थानक व कोल्हे हिल्स परिसरातील दुपारचा थरार, कुणलाही अटक नाही

Youth and relatives beat gang | तरुण व नातेवाईकांना टोळक्याची मारहाण

तरुण व नातेवाईकांना टोळक्याची मारहाण

जळगाव : मुलाच्या जाऊळाच्या कार्यक्रमासाठी येत असलेल्या शालकाला रेल्वे स्थानकावर घेण्यास गेलेल्या चेतन संजय करोसिया (२५, रा़ वाघनगर) या तरूणाला दहा ते बारा जणांनी बेदम मारहाण करीत डोक्यावर काचेचा ग्लास फोडून गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी दुपारी १२़३० वाजेच्या सुमारास घडली़ हा प्रकार एवढ्यावर न थांबता हल्लेखोरांना आपला मोर्चा कोल्हे हिल्सच्या दिशेने वळवित तेथे चेतन याचे नातेवाईक नेहाल संजय शिंदे (रा़ समतानगर) व विशाल अनिल घेंगट (२१, रा़ वाघनगर) यांना रस्त्यात गाठत बेदम मारहाण केली व नेहाल याच्यावर धारधार शस्त्राने वार केला़ तरूणांच्या टोळीकडून झालेल्या मारहाणीत तीन जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
डोक्यावर फोडला काचेचा ग्लास
चेतन याला मारहाण सुरू असताना टोळीतील एकाने बाजूलाच सरबतच्या गाडीवरील काचेचा ग्लास उचलून तो त्याच्या डोक्यावर फोडला़ त्यात चेतन हा गंभीर जखमी झाला व हल्लेखोरांनी तेथून पळ काढला़ त्यानंत चेतन यास जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले़ आणि तातडीने त्याच्या प्राथमिक उपचार करण्यात आले़
अन् दोघांना रस्त्यात गाठले
हल्लेखोर तरूणांनी चेतन याला मारहाण केल्यानंतर आपला मोर्चा कोल्हे हिल्सच्या दिशेने वळविला़ चेतन याचे नातेवाईक असलेले नेहाल व विशाल दोघेही चेतन याच्या घरी पुजेचे साहित्य घेवून दुचाकीने जात होते़ त्यांना वाटेतच गाठत या टोळक्याने त्यांना बेदम मारहाण केली़ यात नेहाल याच्या चेहऱ्यासह हाता-पायाला गंभीर दुखापत झाली व त्यांच्यावर चॉपरने वार केला़ तर विशाल यालाही चेहºयावर गंभीर दुखातप झाली़ नंतर हल्लेखोरांनी तेथून पोबारा केला़ जखमींना जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले़

Web Title: Youth and relatives beat gang

टॅग्स :Jalgaonजळगाव