त्या तरुणाचा नदीत पाय घसरल्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:16 IST2021-04-22T04:16:40+5:302021-04-22T04:16:40+5:30

ओळख पटली : चार दिवसांपासून होता बेपत्ता फोटो जळगाव : सावखेडा शिवारातील गिरणा नदीपात्रात आढळलेला मृतदेह सुनील जानकीराम नन्नवरे ...

The young man died after slipping in the river | त्या तरुणाचा नदीत पाय घसरल्याने मृत्यू

त्या तरुणाचा नदीत पाय घसरल्याने मृत्यू

ओळख पटली : चार दिवसांपासून होता बेपत्ता

फोटो

जळगाव : सावखेडा शिवारातील गिरणा नदीपात्रात आढळलेला मृतदेह सुनील जानकीराम नन्नवरे (३२, रा. बांभोरी, ता. धरणगाव) याचा असल्याचे बुधवारी उघड झाले. हातपाय धुताना पाय घसरून त्याचा मृत्यू झाला असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

तो १६ तारखेपासून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. त्याने कमरेला चप्पल बांधलेली होती.

तालुक्यातील सावखेडा बुद्रक येथील पोलीस पाटील चंद्रकांत उत्तमराव सोनवणे यांना मंगळवारी दुपारी गावालगत असलेल्या गिरणा नदीपात्रात अनोळखी तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली होती. अनेक दिवसांपासून मृतदेह पाण्यात पडून असल्याने तो कुजला होता, तसेच त्याला दुर्गंधी सुटलेली होती. हा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला होता. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

मयत सुनील नन्नवरे हा १६ एप्रिल रोजी कामाला जातो असे सांगून घराबाहेर पडला होता. तीन दिवस उलटूनही तो घरी परतला नव्हता. आज सकाळी व वृत्तपत्रात छापून आलेल्या बातम्यानंतर शंका आल्याने सुनील नन्नवरे यांचा भाऊ अनिल नन्नवरे याने नातेवाईकांसह तालुका पोलीस स्टेशन गाठले. जिल्हा रुग्णालयात जाऊन पाहणी केल्यावर कपड्यांवरुन व कमरेला बांधलेल्या चपलेवरुन त्याची ओळख पटविली. मयत सुनील हा मजुरी करत होता. त्याच्या पश्‍चात पत्नी तसेच वडील जानकीराम दोधू नन्नवरे, आई सुनंदाबाई, भाऊ अनिल, समाधान, अजय व पत्नी असा परिवार आहे.

Web Title: The young man died after slipping in the river