शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हीच सांगा, शेतकऱ्याने जगायचं कसं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 21:57 IST

वडली येथील शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू : शासन तर कधी निसर्गाच्या चक्रात रोज मरतोय शेतकरी

सुनील पाटील ।जळगाव : आधी कोरडा दुष्काळ, त्यात शेतकरी होरपळला गेला. शासनाने अनेक घोषणा केल्या, मात्र प्रत्यक्षात हाती मदत मिळालीच नाही. यंदा पाऊस चांगला आहे, त्यामुळे उत्पन्न चांगले येईल, ही अपेक्षा असताना पाऊस इतका येईल आणि शेतकºयाला उद्ध्वस्त करुन जाईल असे स्वप्नातही वाटले नव्हते...सर्वच बाजूने शेतकरी मरतोय...आता तुम्हीच सांगा शेतकºयाने जगायचं कसं असा उद्विग्न सवाल वडली, ता.जळगाव परिसरातील शेतकºयांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.यंदा परतीच्या पावसाने हाहाकार उडविला असून जिल्ह्यातील शेतकºयांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतला आहे. वडली, म्हसावद, पाथरी, वावडदा, वराड, जळके, सुभाषवाडी व लोणवाडी परिसरात सुरुवातीपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली. कधी नव्हे इतक्या नद्या व नाले या भागातून ओसांडून वाहू लागले. सर्वच तलाव फुल्ल झाले. थोडाही पाऊस आला तर त्यात थेट पीकेच वाहून जात आहेत.एक दोन दिवसाची विश्रांती मिळाली व शेतजमीन सुकली की पुन्हा पाऊस येत असल्याने उभी पिके उद्ध्वस्त होत आहेत.सोयाबीन, कापूस व मका शंभर टक्के उद्ध्वस्तवडली परिसरातील मुख्य पीक कापूस, कांदा,मका, सोयाबीन व ज्वारी हे आहे. या परतीच्या पावसामुळे हे सर्व पीके शंभर टक्के उद्ध्वस्त झाले आहेत.कापसाचा केवळ २० टक्के हंगाम बाकी आहे. कापसाच्या कैºया तितक्या शिल्लक आहेत. अशीच स्थिती राहिली तर तेही पीक येणार नाही.नाल्याकाठच्या विहीरी कोसळल्यावडली शिवारातील माणिक कृष्णा पाटील, गोकुळ वसंत पाटील, रतिलाल रामकृष्ण पाटील या शेतकºयांच्या नाल्याकाठी असलेल्या विहिरी या पावसामुळे कोसळल्या आहेत.गुरांच्या किडनीवर परिणाम...या पावसामुळे सोयाबीन, ज्वारी व मका सडल्याने त्याचा चाराही शिल्लक नाही. हा चारा गुरांनी खाल्ला तर त्यांच्या किडनीवर परिणाम होण्याचा धोका आहे. त्याशिवाय घटसर्प या आजारालाही निमंत्रण देण्यासारखं आहे. गुरांच्या डॉक्टरांनी शेतकºयांमध्ये जनजागृती करुन हा चारा गुरांना खाऊ घालण्यापासून प्रतिबंध केला आहे. त्यामुळे हिवाळा आणि उन्हाळ्यात चाºयाची बिकट समस्या निर्माण झाली आहे.शेतकºयांना सवलत का नाही?... सरकारी नोकरांना भरमसाठ पगार, पेन्शन, आमदार, खासदारांना पगार, पेन्शन व इतर भत्ते, उद्योजकांना कर सवलत, काही कंपन्यांची कर माफी असा फायदा सरकारकडून या वर्गाला केला जातो, आणि जगाचा पोशिंदा मानल्या जाणाºया शेतकºयाला का कोणती सलवत दिली जात नाही. कर्जमाफी पुरेशी दिली जात नाही. कधी सरकार मारते तर कधी निसर्गच शेतकºयाला मारतो, मग शेतकºयांनी काय करावे असा सवाल अनेक लोटन रामचंद्र पाटील या शेतकºयाने केला. 

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव