शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

वीज जोडणीअभावी घनकचरा प्रकल्पाचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:54 IST

जळगाव : घनकचरा प्रकल्पासाठी ठेका देण्यात आलेल्या पूर्वीच्या कंपनीकडे महावितरणची थकबाकी असल्याने आता नवीन महापालिकेला नवीन वीज जोडणी मिळत ...

जळगाव : घनकचरा प्रकल्पासाठी ठेका देण्यात आलेल्या पूर्वीच्या कंपनीकडे महावितरणची थकबाकी असल्याने आता नवीन महापालिकेला नवीन वीज जोडणी मिळत नाही. यामुळे घनकचरा प्रकल्पाचे काम रखडले आहे, असा आरोप आमदार सुरेश भोळे यांनी केला. त्यावर थकबाकी असल्याने वीजजोडणी देता नसल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र पाच लाख जनतेशी संबंधित हा प्रश्न असल्याने उद्याच वीज जोडणी द्या, अशा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महावितरणच्या विविध तक्रारी करण्यात आल्या. यामध्ये जळगाव महापालिकेच्या घनकचऱ्याचाही प्रश्न उपस्थित झाला. यात आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले की, मनपाने या पूर्वी ज्या कंपनीला घनकचऱ्याचा ठेका दिला होता, त्या कंपनीकडे वीजबिलाची थकबाकी आहे. त्यामुळे महावितरण आता मनपाला नवीन वीज जोडणी देत नसल्याचे सांगितले. त्यावर महावितरणचे अधीक्षक अभियंता फारुक शेख यांनी थकबाकी असलेल्यांना नवीन वीज जोडणी देता येत नाही. मात्र ही थकबाकी कंपनीकडे होते, मनपाकडे नाही, असे आमदार भोळे यांनी सांगितले. यावर मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनीही मनपाचे म्हणणे मांडले. तरीही महावितरणचे अधिकारी नवीन वीज जोडणी न देण्यावर ठाम होते. अखेर पालकमंत्र्यांनी उद्याच नवीन वीज जोडणी द्या, अशा सूचना दिल्या.

मनपाकडे असलेल्या थकबाकीवर कोणी बोलत नाही

आमदार सुरेश भोळे यांनी घनकचरा प्रकल्पासह शहरातील विविध भागातील वीजपुरवठ्याच्या समस्येविषयी मुद्दा मांडला. त्यावर अधीक्षक अभियंता फारुक शेख यांनी महापालिकेकडे सात ते आठ कोटींची थकबाकी आहे, त्याविषयी कोणी बोलत नाही, असे थेट वक्तव्य केले. त्यावर मात्र कोणी काहीच बोलले नाही.

खड्डे बुजवायला पैसे नाही, महामार्ग काय करणार? पालकमंत्री

शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या कामाविषयी अनेक तक्रारीदेखील मांडण्यात आल्या. खोटेनगर ते कालिंकामाता मंदिर दरम्यान अनेक अडचणी असून ठिकठिकाणच्या कामांचा समावेश करून नवीन डीपीआर सादर करा, अशा सूचना खासदार उन्मेष पाटील यांनी नहीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. या सोबतच शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या कामात अनेक अडचणी असल्याने हे रस्ते मनपाकडे द्या, असा मुद्दा समोर आला. मात्र मनपाकडे पैसे नसल्याने त्यांच्याकडून ही कामे होणार नाही, यासाठी हा रस्ता सा.बां. विभागाकडे वर्ग करा, असे पालकमंत्री पाटील म्हणाले. मनपा शहरातील खड्डे बुजवू शकत नाही, महामार्गाचे काम काय करेल, असा चिमटाही पालकमंत्र्यांनी काढला.

१५ दिवसात गाळ्यांचा प्रश्न मार्गी

शहरातील व्यापाऱ्यांचा प्रश्न बिकट असून मनपाच्या गाळ्यांवरही टांगती तलवार आहे. त्यामुळे या विषयी तोडगा काढावा, अशी मागणी नगरसेवक नितीन बरडे यांनी केली. त्यावर आपली चर्चा झाली असून १५ दिवसात हा प्रश्न मार्गी लागेल, असा दावा पालकमंत्री पाटील यांनी केला.