शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सांगितल्याप्रमाणे जबाब न दिल्यामुळे महिलेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : आशादीप वसतिगृह प्रकरणातील जबाब जिल्हाधिकारी यांच्या समक्ष देण्‍यास सांगितले होते. मात्र, सांगितल्याप्रमाणे जबाब ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : आशादीप वसतिगृह प्रकरणातील जबाब जिल्हाधिकारी यांच्या समक्ष देण्‍यास सांगितले होते. मात्र, सांगितल्याप्रमाणे जबाब का दिला नाही, म्हणत साहिल आयुब पठाण (२२, रा. समता नगर) याने विवाहित महिलेला मारहाण करीत विनयभंग केल्याची घटना गुरूवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्‍यात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

रामानंदनगर पोलीस ठाण्‍याच्या हद्दीत पीडित महिला ही कुटूंबियांसह वास्तव्यास आहे. गेल्या महिन्याभरापूर्वी तिची मुलगी हरविली होती. याप्रकरणी महिलेने पोलिसात हरविल्याची नोंद केली होती. बेपत्ता झालेली मुलगी पोलिसांना मिळून आल्याने पोलिसांनी तिला आशादीप वसतिगृहात ठेवले होते. नंतर मुलीली तिच्या आईच्या ताब्यात देण्‍यात आले होते. या काळातच १ मार्च रोजी वसतिगृह येथे मुलींना नाचविण्याची तक्रार झाली हाेती. याप्रकरणी महिलेचा जिल्हाधिकारी यांच्याकडे जबाब नोंदविण्यात आला होता. नंतर ही महिला शेगाव येथे निघून गेली होती.

मारहाणीनंतर केला विनयभंग

शेगाव येथून गुरूवारी सायंकाळी ६ वाजता महिला घरी परतली. सायंकाळी ७ वाजता साहिल आयुब पठाण हा महिलेचा घरी आला. जिल्हाधिकारी यांच्यासमोर मी सांगितल्याप्रमाणे जबाब का दिला नाही, असे म्हणत महिलेल शिवीगाळ केली व मारहाण करीत विनयभंग केला.

जीवे ठार मारण्याची धमकी

पीडित महिलेने साहिल याच्या तावडीतून सुटून घरातून पळ काढला. दरम्यान साहिल हा तिच्या मागे पळत जावून त्या महिलेला मारहाण करीत तिला जीवेठार करण्याची धमकी देखील दिली. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि शांताराम पाटील करीत आहे.