शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
5
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
6
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
7
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
8
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
9
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
10
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
11
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
13
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
14
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
15
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
16
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
17
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
18
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
19
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
20
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात सव्वादोन लाखांवर कुटुंब शौचालयाविना

By admin | Updated: June 15, 2017 18:10 IST

15 तालुक्यांपैकी फक्त एकच म्हणजेच भुसावळ तालुका हगणदरीमुक्त झाला.

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 15 - जिल्हाभरात हगणदरीमुक्त ग्रा.पं.बाबत मागील दोन वर्षे मोठय़ा प्रमाणात निधी खर्च करून व योजना राबवूनही समाधानकारक चित्र निर्माण झालेले नाही. 1151 पैकी फक्त 384 ग्रा.पं. हगणदरीमुक्त झाल्या आहेत. तर 15 तालुक्यांपैकी फक्त एकच म्हणजेच भुसावळ तालुका हगणदरीमुक्त झाला. इतर तालुक्यांमध्ये व्यक्तिगत लाभाची शौचालये निर्मितीबाबत धीम्या गतीने कार्यवाही सुरू आहे. जिल्हा हगणदरीमुक्तीसंबंधी राज्यात पिछाडीवर असलेल्या 10 जिल्ह्यांमध्ये असून, यासंदर्भात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार मिणा यांनी जि.प.त मार्च 2017 मध्ये झालेल्या आढावा बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तीन वर्षापूर्वी जिल्हाभरात ग्रा.पं. अंतर्गत चार लाख 91 हजार 301 कुटुंबांकडे शौचालये नव्हती. मागील तीन वर्षे स्वच्छ भारत मिशन व इतर कार्यक्रमांच्या माध्यमातून अनुदान देऊन दोन लाख 78 हजार 18 एवढी व्यक्तीगत लाभाची शौचालये उभारली. मध्यंतरी साडेचार हजार रुपये अनुदान एका शौचालयासाठी दिले जायचे, आता हे अनुदान वाढवून 12 हजार रुपये केले असल्याची माहिती जि.प.च्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने दिली. जिल्ह्यात 15 तालुके आहेत. दोन लाख 28 हजार 18 शौचालये बांधण्यासाठी तीन वर्षे कालावधी लागला आता उर्वरित दोन लाख 13 हजार 283 शौचालये या वर्षात म्हणजेच येत्या सहा महिन्यात पूर्ण करायचे आहेत. 2018 हे वर्ष सुरू होण्यापूर्वी जिल्हा हगणदरीमुक्त करण्याचे उद्दिष्ट जि.प.ला दिले आहे, पण कामांची गती व अपूर्ण निधी लक्षात घेता हे आव्हान कसे पेलवेल, असा मुद्दा आहे. जिल्हाभरात 1151 ग्रा.पं. आहेत, पैकी फक्त 384 ग्रा.पं. हगणदरीमुक्त झाल्या आहेत, उर्वरित 767 ग्रा.पं. हगणदरीमुक्त कशा व केव्हा होतील, असा प्रश्न आहे.