शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

ममुराबादला सेंट्रल बँंक व्यवस्थापकाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 23:39 IST

ममुराबाद, ता. जळगाव : सेंट्रल बँकेच्या येथील शाखेत गेल्या चार महिन्यांपासून व्यवस्थापक पद रिक्त असल्याने असंख्य कर्ज प्रकरणे रखडली ...

ममुराबाद, ता. जळगाव : सेंट्रल बँकेच्या येथील शाखेत गेल्या चार महिन्यांपासून व्यवस्थापक पद रिक्त असल्याने असंख्य कर्ज प्रकरणे रखडली असून, शेतकऱ्यांसह स्वयंसहाय्यता बचतगटाच्या महिलांना त्यामुळे गैरसोयींचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे. बँकेच्या नियमित व्यवहारांवरही त्याचा विपरीत परिणाम झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.ममुराबादसह परिसरातील धामणगाव, नांद्रा खुर्द, खापरखेडा, तुरखेडा आदी गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या सेंट्रल बँकेच्या शाखेत सुमारे २० हजारपेक्षा जास्त खाते धारकांचा व्यवहाराच्या निमित्ताने संपर्क येत असतो. श्रावणबाळ निवृत्तीवेतन व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थींनाही याच शाखेतून पैसे अदा केले जातात. ग्राहकांची मोठी संख्या लक्षात घेता या बँकेत दोन रोखपालांची पदे स्थापित केली आहेत. प्रत्यक्षात त्याठिकाणी केवळ एकच रोखपाल सध्या कार्यरत आहे. दुसरे पद गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त असल्याने बँकेत पैसे भरणाऱ्यांसह काढणाºयांना तासनतास रांगेत उभे राहावे लागते. घाई गर्दीत असलेल्यांकडून त्याबद्दल बँक प्रशासनाला जाब देखील विचारला जातो. मात्र, मुख्य व्यवस्थापकच जागेवर नसल्यानंतर त्यांची कोणीच दादपुकार घेत नसल्याची स्थिती आहे.यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडून व्यवस्थापकाचे पद भरले जात नसल्याची माहिती कार्यालयीन कर्मचारी एम. डी. देखणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.बचतीच्या माध्यमातून बँकेत पत निर्माण करण्यासाठी आम्ही महिलांनी ममुराबाद येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत बचतगटाच्या नावे खाते उघडले आहे. त्यात आम्ही गेल्या वर्षभरापासून नियमितपणे पैसे देखील भरत आहोत. मात्र, बँकेकडून आम्हाला प्रत्येकवेळी व्यवस्थापक नसल्याचे कारण सांगून नवीन कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे.-स्वयंसहाय्यता बचतगटाची एक महिला.

टॅग्स :bankबँकJalgaonजळगाव