पत्नी माहेरी गेली अन् पतीने आत्महत्या केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:57 IST2021-02-05T05:57:11+5:302021-02-05T05:57:11+5:30

नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, धनराज हा मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. पत्नी सीमा, दोन मुले व मुलगी असा त्यांचा ...

Wife Maheri Geli Anpati committed suicide | पत्नी माहेरी गेली अन् पतीने आत्महत्या केली

पत्नी माहेरी गेली अन् पतीने आत्महत्या केली

नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, धनराज हा मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. पत्नी सीमा, दोन मुले व मुलगी असा त्यांचा परिवार आहे. पत्नी सीमा दोन दिवसांपूर्वी मुलांसह माहेरी जळगाव जामोद येथे गेली आहे. त्यामुळे धनराज घरी एकटाच होता. मंगळवारी त्याने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविले. आईवडील सायंकाळी शेतातून घरी परतल्यानंतर त्यांना धनराज याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळाल्यावर ज्ञानेश्वर महाराज जळकेकर व पोलीस पाटील संजय चिमणकर यांनी घटनास्थळ गाठून धनराज यास जिल्हा रुग्णालयात हलविले. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळाल्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विशाल सोनवणे, रतिलाल पवार यांनी पंचनामा व शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. कर्जबाजारीपणामुळे धनराज काही दिवसांपासून नैराश्यात होता त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती जळकेकर महाराज यांनी दिली.

Web Title: Wife Maheri Geli Anpati committed suicide