शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! बहिणीला भेटून परतताना भीषण अपघात, दोन मित्रांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 20:15 IST

Accident News: चोपडा येथे बहिणीला भेटून घरी परत येत असताना समोरुन येणारी चारचाकी दुचाकीवर धडकल्याने दोघांचा मृत्यू झाला.

जळगाव : चोपडा येथे बहिणीला भेटून घरी परत येत असताना समोरुन येणारी चारचाकी दुचाकीवर धडकल्याने हर्षल भिका पाटील (वय १९) हा जागीच ठार झाला तर नितीन निंबा भील (वय २३) याचा रुग्णालयात मृत्यू झाला. ऋषीकेश छाटू पाटील (वय २१, तिघं रा.वाघळूद, ता.धरणगाव) हा तरुण जखमी झाला. हा अपघात शनिवारी दुपारी तीन वाजता वेले, ता.चोपडा गावाजवळ झाला.

वाघळूद येथील हर्षल, नितीन व ऋषीकेश हे तिघं मित्र होते. ऋषीकेशची बहिण चोपडा येथे असल्याने तिला भेटण्यासाठी तिघं जण शनिवारी सकाळी दुचाकीने (क्र.एम.एच.१९ बी.सी.७८०४) गेले होते. तेथून परत येत असताना वेले, ता.चोपडा गावाजवळ समोरुन येणाऱ्या चारचाकीने (क्र.एम.एच.१८ ए.बी.२३०३) दुचाकीला धडक दिली. दोन्ही वाहने वेगात असल्याने दुचाकीवरील तिघं जण लांब फेकले गेले. नितीन याच्या डोक्याला जबर मार  लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर हर्षल व ऋषीकेश या दोघांना जखमी अवस्थेत चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने हर्षल याला जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात हलविले, मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी डॉ.सचिन अहिरे यांनी त्यास मृत घोषीत केले. ऋषीकेश याच्यावर चोपड्यात उपचार सुरु असून त्याचे दोन्ही हात फ्रॅक्चर असल्याचे सांगण्यात आले.

तिघंही एकुलते; नितीनचे दोन महिन्यापूर्वीच झाले लग्नहर्षल, नितीन व ऋषीकेश हे तिघं आपआपल्या कुटुंबात एकुलते होते.  नितीन याचे दोन महिन्यापूर्वीच लग्न झाले होते तर हर्षल व ऋषीकेश हे अविवाहित असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. तिघांचे आई, वडील मजुरी करुन उदरनिर्वाह भागवितात. हर्षलच्या मृत्यूची बातमी समजताच जळगावातील नातेवाईक व गावावरुन वडील व इतरांनी धाव घेतली. आत्या व वडीलांचा आक्रोश मन हेलावणारा होता.

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव