सभापती व सभासदांत हमरीतुमरी

By Admin | Updated: May 30, 2017 00:34 IST2017-05-30T00:34:13+5:302017-05-30T00:34:13+5:30

नेरी : कापूस उत्पादक संस्थेच्या जागा विक्रीचा घाट, सभासदांचा विरोध

We have a meeting between the Speaker and the Member | सभापती व सभासदांत हमरीतुमरी

सभापती व सभासदांत हमरीतुमरी

नेरी, ता.जामनेर : जामनेर तालुका कापूस उत्पादक सेवा सहकारी संस्थेची बखळ जागा विक्री करण्याचा घाट रचला जात असून, यास संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत काही सभासदांनी विरोध केला असता संस्थेचे सभासद व जामनेर बाजार समितीचे सभापती यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक होऊन त्याचे रूपांतर हमरीतुमरीत झाले.
      सोमवारी सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या संस्थेच्या सर्वसाधारण सभेत अनेक विषयांवर खमंग चर्चा सुरू असताना संस्थेच्या मालकीची गट नंबर 306 पैकी मुख्य कार्यालयाच्या दक्षिणेकडील काही मोकळी जागा विक्री करण्याचा विषय घेण्यात आला. यावर गोविंदा पंढरी पाटील, तुकाराम शेळके, गोरख इधाटे यांच्यासह अनेक शेतक:यांनी जागा विक्री करण्यास तीव्र विरोध करत आपला संताप व्यक्त केला.
    त्याचवेळेस बाजार समितीचे सभापती तुकाराम निकम यांनी विरोध करणा:या शेतक:यांना समजावण्याचा प्रय} केला. तेव्हा नेरी दिगर येथील शेतकरी गोविंदा पाटील यांनी तुकाराम निकम यांनादेखील विरोध केला. यावरून दोघांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची होऊन त्याचे पर्यवसान हमरीतुमरीत झाले. मात्र जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, संस्थेचे चेअरमन संजय पाटील, संचालक अनिल पाटील आदींनी वेळीच या दोघांमध्ये मध्यस्थी करीत वादावर पडदा टाकला. संस्थेचे जिनिंग प्रेसिंग युनिट सन 2017 ते 2022 या मुदतीत भाडेकराराने देण्यासंबंधी चर्चा करण्यात आली.
एकंदरीत, झालेल्या या वादळी सभेत मंजूर झालेले विषय                पुढे कशा पद्धतीने हाताळले जातात याकडे सर्व सभासदांचे लक्ष लागून आहे.
संस्थेला पैशांची गरज नसताना जागा विकायची कशाला? ही जागा एका व्यापा:याच्या खिशात घालायची हा यामागील हेतू आहे. विरोध केल्याने सभापतींनी अपशब्द वापरल्याने वाद निर्माण झाला. कुठल्याही परिस्थितीत जागा विकू दिली जाणार नाही.
-गोविंदा पंढरी पाटील, शेतकरी, नेरी दिगर, ता. जामनेर    

Web Title: We have a meeting between the Speaker and the Member