वॉटर कुलरचे लोकार्पण

By Admin | Updated: September 8, 2015 17:46 IST2015-09-08T17:31:04+5:302015-09-08T17:46:14+5:30

सोशल मीडिया सेल भाजपा महानगरतर्फे सिव्हील हॉस्पिटल येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अन्नपूर्णा योजना राबविण्यात येणार्‍या जनकल्याण समितीस वॉटर कुलरचे लोकार्पण करण्यात आले.

Water closers release | वॉटर कुलरचे लोकार्पण

वॉटर कुलरचे लोकार्पण

जळगाव : सोशल मीडिया सेल भाजपा महानगरतर्फे सिव्हील हॉस्पिटल येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अन्नपूर्णा योजना राबविण्यात येणार्‍या जनकल्याण समितीस वॉटर कुलरचे लोकार्पण जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या हस्ते करण्यात आले. 
यावेळी प्रमुख उपस्थिती खासदार ए.टी. पाटील यांची होती. अध्यक्षस्थानी आमदार सुरेश भोळे होते.
दीपक घाणेकर, पोलीस वाहतूक निरीक्षक- चंद्रकांत सरोदे, अशोक लाडवंजारी, बंडू काळे, सुनील माळी, सुशील हसवाणी, संजय लुल्ला, जुगल जुल्ला, अनिल देशमुख, अँड.सत्यजीत पाटील, अमित चौधरी, चेतन शर्मा इ. यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सोशल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष जयेश ठाकूर, राजेल मलिक, जितेंद्र चव्हाण, महेश ठाकूर, डॉ.अभिषेक ठाकूर, रियाझ शेख, राष्ट्रीय स्वयंसेवक, संघाचे पदाधिकारी व जनकल्याण समितीचे तसेच शेरा बॉईज संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Water closers release