शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विलास पारकरांकडून बंडखोर नगरसेवकांचा ‘ब्रेन वॉश’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:13 IST

नाराजी दूर करण्याचा केला प्रयत्न; जळगाव संपर्कप्रमुखपद सावंतांऐवजी पारकरांनी घेण्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेत शिवसेनेची सत्ता ...

नाराजी दूर करण्याचा केला प्रयत्न; जळगाव संपर्कप्रमुखपद सावंतांऐवजी पारकरांनी घेण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महापालिकेत शिवसेनेची सत्ता येऊन तीन महिने पूर्ण झाले असले तरी या तीन महिन्यांत सेनेत गटबाजी वाढली आहे. त्यात भाजपने बंडखोर नगरसेवकांविरोधात दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिकेवरील नोटिसा नगरसेवकांना प्राप्त झाल्यानंतर काही नगरसेवकांमध्ये चलबिचल वाढली होती. ही चलबिचल लक्षात घेता शुक्रवारी रावेर लोकसभेचे संपर्कप्रमुख विलास पारकर यांनी बंडखोर नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांचा ‘ब्रेन वॉश’ करण्याचा प्रयत्न केला आहे.

उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या सतराव्या मजल्यावरील दालनात ही बैठक घेण्यात आली. या बैठकीला विलास पारकर यांच्यासह महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील व भाजपचे सर्व बंडखोर नगरसेवक उपस्थित होते. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शनिवारी होणाऱ्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत आढावा घेण्यात आला. तसेच शनिवारी होणाऱ्या बैठकीत मांडण्यात येणाऱ्या मुद्द्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली.

संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्याबाबत व्यक्त केली नाराजी

पारकर यांनी घेतलेल्या या बैठकीत बंडखोर नगरसेवकांनी जळगाव लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करण्याचीही मागणी केली. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्याकडून काढून हे पद पारकरांनी घ्यावे, अशी विनंतीदेखील बंडखोर नगरसेवकांनी या बैठकीत केली. तसेच स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीबाबतही सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत पक्षश्रेष्ठींकडे चर्चा केली जाईल, असे आश्वासन पारकर यांनी दिले.

निधीवाटपात घेण्यात आले नाही विश्वासात, नगरसेवकांची तक्रार

महापालिकेत जरी शिवसेनेची सत्ता असली तरी सेनेचे आधीचे नगरसेवक निधीवाटपात बंडखोर नगरसेवकांना विश्वासात घेत नसल्याची तक्रार नगरसेवकांनी केली. मनपात गेल्या महिन्यात ८ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आल्यानंतर त्या निधीतील सर्व कामे १५ नगरसेवकांनी आपआपल्या प्रभागात मंजूर करून घेतल्याचीही तक्रार नगरसेवकांनी केली. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत मनपासाठी निधीची तरतूद करून, बंडखोर नगरसेवकांच्या प्रभागातील कामे मार्गी लावण्याचे आश्वासन पारकर यांनी दिले.

घाबरू नका, अपात्रतेच्या विषयावरही तोडगा काढू

अनेक नगरसेवकांनी विभागीय आयुक्तांकडून आलेल्या अपात्रतेच्या नोटिसांमुळे अपात्रतेची टांगती तलवार असल्याने ही कारवाई लवकर झाल्यास अडचणी येतील, असे सांगितले. त्यावर याबाबतदेखील तोडगा काढून चांगल्या वकिलांचा सल्ला घेऊन ही लढाईदेखील जिंकू. अपात्रतेच्या बाबतीत घाबरू नका, असेही पारकर यांनी या बैठकीत नगरसेवकांना सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.