शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

शिरसोलीतील बाधिताच्या पत्नीचे रुग्णालयातून रात्री पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 13:19 IST

शिरसोली ता. जळगाव : शिरसोली येथील बारी नगरात बुधवारी बाधित रुग्ण आढळल्यानंतर त्याची पत्नी व इतर सात नातेवाईकांना बुधवारी ...

शिरसोली ता. जळगाव : शिरसोली येथील बारी नगरात बुधवारी बाधित रुग्ण आढळल्यानंतर त्याची पत्नी व इतर सात नातेवाईकांना बुधवारी रात्रीच कोविड रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र या महिलेने रात्री १० वाजेच्या सुमारास शिरसोली गाठल्याने अधिकच भिती पसरली. सकाळी हा प्रकार सकाळी पोलीस पाटील व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला. त्यांनी लागलीच रुग्णवाहिका बोलावून या महिलेची कोविड रुग्णालयात रवानगी केली. ही महिला रात्री घरी कशी परतली याबाबत चर्चा सुरु झाली आहे.बुधवारी गावात कोरोना बाधित आढळल्याची वार्ता पसरताच खळबळ उडाली. दरम्यान कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून औषधी दुकाने, दवाखाने व दुध पुरवठा वगळता सर्व दुकाने गुरुवारपासून तीन दिवस बंद राहणार आहेत. दुकान उघडल्यास ग्रामपंचायतीकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत गावात दवंडी देण्यात आली आहे. पोलिसांचा बंदोबस्त वाढविल्याने गावात शुकशुकाट आहे.दरम्यान कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आशावर्कर ह्या गावात घरोघर जाऊन कुणाला खोकला,ताप व काही त्रास होतो आहे का याचा सर्वे करीत आहेत. तसेच बाहेर गावाहून येणा-या जाणा-यांची चौकशी केली जात आहे.गुरुवारी सकाळी फवारणी करण्यात आली. यावेळी पंचायत समिती सभापती नंदलाल पाटील व पोलीस पाटील शरद पाटील, आरोग्यविभागाचे डॉ. निलेश अग्रवाल, प्रशांत गर्गेकर, अनिल महाजन, एम,यु वानखेडे, नीलेश चौधरी,सलिम पिंंजारी ,गोपाल बारी, प्रमोद रगरे उपस्थित होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव