पत्रकार संघातर्फे विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:11 IST2021-07-12T04:11:46+5:302021-07-12T04:11:46+5:30

पाचोरा : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबईतर्फे पत्रकारांना मोफत हेल्मेट वाटप, रक्तदान शिबिर व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी ...

Various programs by the press team | पत्रकार संघातर्फे विविध कार्यक्रम

पत्रकार संघातर्फे विविध कार्यक्रम

पाचोरा : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबईतर्फे पत्रकारांना मोफत हेल्मेट वाटप, रक्तदान शिबिर व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार वितरण रविवारी झाले.

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डॉ. भूषण मगर, डॉ.स्वप्निल पाटील यांच्यासह ठिकठिकाणी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील यांनी धावती भेट दिली. दोन सत्रात झालेल्या दुसर्‍या सत्राच्या अध्यक्षस्थानी राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे होते.

व्यासपीठावर नवनाथ जाधव, जिल्हाध्यक्ष प्रवीण सपकाळे, किशोर रायसकडा, प्रमोद सोनवणे, मिलिंद लोखंडे, प्रदीप गायके, नाजनीन शेख, हेमंत विसपुते, शरद कुलकर्णी, देवेंद्र साळी, सचिन सोमवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पत्रकारांना मोफत हेल्मेट वाटप करण्यात आले. पत्रकार संघ पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले.

प्रास्ताविक किशोर रायसकडा यांनी केले, तर प्रवीण सपकाळे, डॉ. भूषण मगर, देवेंद्र साळी, एस.आर. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

Web Title: Various programs by the press team