वाघोडा रेल्वेस्थानकावर धावत्या रेल्वेखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:12 IST2021-07-19T04:12:02+5:302021-07-19T04:12:02+5:30

भुसावळ रेल्वे पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद रावेर : भुसावळ- बऱ्हाणपूर रेल्वेमार्गावरील वाघोडा रेल्वेस्थानकावर १६ जुलै रोजी रात्री १०.३० वाजेच्या ...

Under the running train at Waghoda railway station | वाघोडा रेल्वेस्थानकावर धावत्या रेल्वेखाली

वाघोडा रेल्वेस्थानकावर धावत्या रेल्वेखाली

भुसावळ रेल्वे पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

रावेर : भुसावळ- बऱ्हाणपूर रेल्वेमार्गावरील वाघोडा रेल्वेस्थानकावर १६ जुलै रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास सुपरफास्ट एक्स्प्रेसखाली चिरडून तालुक्यातील खानापूर येथील एका ४५ वर्षीय इसमाचा अकस्मात मृत्यू झाला.

भुसावळ रेल्वे पोलीस सूत्रानुसार वृत्त असे की, तालुक्यातील खानापूर येथील ट्रॅक्टर चालक दगडू तुकाराम सोनवणे (वय ४५) यांचा मध्य रेल्वेच्या बऱ्हाणपूर- भुसावळ रेल्वेमार्गावरील वाघोडा रेल्वेस्थानकासमोर अप रेल्वेमार्गावरील खांब क्रमांक ४८८/१० जवळ कानपूर- वलसाड उद्योगकर्मी स्पेशल रेल्वे एक्स्प्रेसखाली चिरडून अकस्मात मृत्यू झाला.

याबाबत वाघोडा रेल्वेस्थानकाचे उपअधीक्षकांनी दिलेल्या खबरीवरून भुसावळ रेल्वे पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रावेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. एन.डी. महाजन यांनी शवविच्छेदन केले. या दुर्घटनेने खानापूर परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. शुक्रवारी रात्री अज्ञात मृतक म्हणून भुसावळ रेल्वे पोलिसांनी शव ताब्यात घेतले असता, शनिवारी त्यांच्या चप्पल व कपड्यावरून त्यांच्या मुलाला ओळख पटली. ‌शवविच्छेदनानंतर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व दोन मुली, असा परिवार आहे.

भुसावळ रेल्वे पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल उत्तम वाघ पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Under the running train at Waghoda railway station