उमाळ्यात ग्रा.पं. निवडणुकीचा वाद उफाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:16 IST2021-01-21T04:16:03+5:302021-01-21T04:16:03+5:30

उमाळा येथे झालेल्या निवडणुकीत बाजार समितीचे माजी संचालक मनोहर भास्कर पाटील यांच्या गटाला पाच तर प्रतिस्पर्धी राजू बाबूराव पाटील ...

In Umalya, G.P. The election controversy erupted | उमाळ्यात ग्रा.पं. निवडणुकीचा वाद उफाळला

उमाळ्यात ग्रा.पं. निवडणुकीचा वाद उफाळला

उमाळा येथे झालेल्या निवडणुकीत बाजार समितीचे माजी संचालक मनोहर भास्कर पाटील यांच्या गटाला पाच तर प्रतिस्पर्धी राजू बाबूराव पाटील यांच्या गटाला सहा जागा मिळाल्या आहेत. निकाल लागल्यापासून दोन्ही गटात धुसफूस सुरू होती. बुधवारी गावठाण जागेत राजू पाटील व इतर सहकारी थांबलेले असताना खुन्नस देण्याच्या कारणावरून प्रकाश चव्हाण व राजू पाटील यांच्यात वाद झाला. त्यावेळी दोघांनी हातात लाठ्याकाठ्या घेऊन एकमेकांच्या अंगावर चाल केली. यावेळी राजू पाटील यांच्या हातात तलवार होती, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दंगल, मारहाण व आर्म ॲक्टचा गुन्हा

प्रकाश चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजू बाबूराव पाटील, शंकर बाबूराव पाटील, रघुनाथ बाबूराव पाटील, संजय बाबूराव पाटील, युवराज नामदेव चव्हाण, नामदेव लक्ष्मण चव्हाण, किरण अण्णा चव्हाण, नितीन अण्णा चव्हाण, भीमराव झिपरु पाटील, समाधान भीमराव पाटील, किरण ऊर्फ भय्या भीमराव पाटील, सुमीत निंबा धनगर, पंढरी पंडित धनगर व सुरेश अर्जून धनगर (सर्व रा.उमाळा) यांच्याविरुद्ध दंगल व आर्म ॲक्ट तर भीमराव झिपरु पाटील यांच्या फिर्यादीविरुद्ध रघुनाथ साहेबराव चव्हाण, भगवान साहेबराव चव्हाण, प्रकाश साहेबराव चव्हाण, शेखर नाना पाटील, शुभम रघुनाथ चव्हाण, आरती संजय मोरे व मंगलाबाई रघुनाथ चव्हाण (सर्व रा.उमाळा) यांच्याविरुद्ध दंगल व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील यांनी जखमींचा जबाब नोंदवून घटनेची माहिती घेतली.

Web Title: In Umalya, G.P. The election controversy erupted