गोराळा धरण येथे वीज पडल्याने दोन तरुण जखमी
By विवेक चांदुरकर | Updated: July 6, 2023 20:21 IST2023-07-06T20:20:45+5:302023-07-06T20:21:37+5:30
विवेक चांदूरकर जळगाव जामोद : गोराळा धरण येथे वीज पडल्याने दोन तरुण जखमी झाल्याची घटना ६ जुलै रोजी सायंकाळी ...

गोराळा धरण येथे वीज पडल्याने दोन तरुण जखमी
विवेक चांदूरकर
जळगाव जामोद : गोराळा धरण येथे वीज पडल्याने दोन तरुण जखमी झाल्याची घटना ६ जुलै रोजी सायंकाळी घडली. तालुक्यामध्ये येत असलेल्या गोराळा धरण परिसरात विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.
गोराळा धरणाजवळ जगदीश भारसिंग मोहता (वय २२ वर्षे) व साना लोहारसिंग निंगवाल (वय २८ वर्षे) हे दोन तरुण गेले असता बाजुला वीज पडल्याने जखमी झाले. दोघांना जखमी अवस्थेत गावकऱ्यांच्या मदतीने जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी खामगाव येथील सामान्य रूग्णालयात पाठविण्यात आले.