रावेर : तालुक्यातील केºहाळे खूर्द येथुन जवळच असलेल्या शेत शिवारात केºहाळे खुर्द येथील दोन महिलांचा खून केल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शालुबाई गौतम तायडे (वय ४५) व नसिबा रूबाब तडवी (वय ५०) असे मयत महिलांचे नाव आहे.गावाजवळच शेत शिवारात दुपारी १२ वाजेच्या सुमारास दोन महिलांचा मृतदेह आढळून आला. ही वार्ता वाऱ्या सारखी गावात पसरली. रावेर पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत महिलांच्या डोक्यावर व छातीवर तीक्ष्ण हत्याराने वार केलेले आहेत. घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती.हा खून कोणी व कोणत्या कारणामुळे केला असावा हे सायंकाळपर्यंत स्पष्ट होऊ शकलेले नव्हते.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}