मुलीला शिवीगाळ करून दोघांनी एकाला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:16 IST2021-04-04T04:16:03+5:302021-04-04T04:16:03+5:30

जळगाव : जळगाव रेल्वे स्टेशनकडून घराकडे पायी जात असताना मुसेफ मुलतानी व त्याच्या साथीदाराने दिलीप भीमराव जाधव (४३, रा.चाळीसगाव) ...

The two robbed one of them by abusing the girl | मुलीला शिवीगाळ करून दोघांनी एकाला लुटले

मुलीला शिवीगाळ करून दोघांनी एकाला लुटले

जळगाव : जळगाव रेल्वे स्टेशनकडून घराकडे पायी जात असताना मुसेफ मुलतानी व त्याच्या साथीदाराने दिलीप भीमराव जाधव (४३, रा.चाळीसगाव) यांना मारहाण करून लुटल्याची घटना शुक्रवारी रात्री ८ वाजता गेंदालाल मिल परिसरात घडली.

दिलीप जाधव व त्यांची पुतणी असे दोघेजण शुक्रवारी रात्री रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर घराकडे जात असताना गेंदालाल मिलजवळील एका मेडिकलजवळ मुसेफ मुलतानी व एकाने त्यांना अडवले. जाधव यांच्या खिशातील १२०० रुपये जबरीने काढून घेतले. प्रतिकार केला असता त्यांना मारहाण झाली. माझ्या काकाला का मारतात, आमचे पैसे परत करा, असे सांगणारी पुतणी सोनी हिलादेखील दोघांनी शिवीगाळ केली. या घटनेनंतर काका-पुतणीने शहर पोलीस स्टेशन घटना तक्रार दिली. त्यावरून पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास अक्रम शेख करीत आहे.

Web Title: The two robbed one of them by abusing the girl