जळगावजवळ भीषण अपघात, दोन जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 18:12 IST2019-01-24T18:05:47+5:302019-01-24T18:12:54+5:30
दोन ट्रक एकमेकांवर धडकून भीषण अपघात घडल्याचे वृत्त समोर आले आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.

जळगावजवळ भीषण अपघात, दोन जणांचा मृत्यू
जळगाव : दोन ट्रक एकमेकांवर धडकून भीषण अपघात घडल्याचे वृत्त समोर आले आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक आहे. राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी(24 जानेवारी) सकाळी 7.45 वाजण्याच्या सुमारास जळगावजवळ अपघात झाला. या अपघातानंतर परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
(नाशिकजवळ बस-कारच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघे ठार)
पोपट पांडुरंग पठारे (वय ५० वर्ष) आणि चालक गयास गंभीर पिंजारी (वय ६८वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त ट्रकपैकी एक ट्रक नागपूर येथून कोळसा घेऊन जळगावच्या दिशेनं प्रवास करत होता. तर दुसरा ट्रक जळगाव येथून सिमेंट घेऊन जात होता. हे दोन्ही ट्रक जळगाव जवळ आल्यानंतर त्यांची भीषण धडक झाली आणि दुर्घटना घडली.